कारंजा (लाड) : ज्याप्रमाणे चातक पक्ष्याला पावसाची अपेक्षा असते व त्या करीतो तो निसर्गाकडे याचना करीत असतो अगदी त्याचप्रमाणे तळागाळातील दारिद्रय रेषेखालील गोरगरीब गरजू दिव्यांग,वयोवृद्ध,विधवा, परित्यक्त्या यांना शासनाच्या (अर्थसहाय्य) अनुदानाची प्रतिक्षा असते. व आपल्या केविलवाण्या नजरेने ते शासकिय अर्थ सहाय्य केव्हा मिळणार ? याची वाट बघत बँकांच्या येरझारा करीत असतात. त्यातच यंदा अतिवृष्टिचा पाऊस सुरु असल्यांने अनेक निराधारांना मोलमजूरीसुद्धा करता येत नव्हती. ती मंडळी आर्थिक विवंचनेत सापडले होती. सणांचा राजा दिपावली कशी साजरी करावी ? ह्या विवंचनेत होते. त्यामुळे शासनाने निराधारांना दिपावलीपूर्वी अविलंब अनुदान वितरीत करावे अशी त्यांची रास्त मागणी होत होती. म्हणूनच महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी निराधारांची दिपावली गोड करण्यासाठी कारंजा येथील कर्तव्यदक्ष तहसिलदार धिरजजी मांजरे यांचेकडे निराधारांना दिपावलीपूर्वी अनुदान दिले जावे अशी विनम्र प्रार्थना तथा कळकळीची मागणी रेटून धरली होती व वेळोवेळी तसा पाठपुरावाही केला होता. आणि कर्तव्यदक्ष तहसिलदार धिरजजी मांजरे यांनी सुद्धा गोरगरीब निराधारांची दिवाळी गोड करण्याच्या दृष्टिने स्वतः जातीने काळजीपूर्वक लक्ष्य देवून दि. १७ ऑक्टोंबर रोजी कोषागार कार्यालयातून रक्कम मंजूर करून घेत दि १८ ऑक्टोंबर रोजी सर्वच सहकारी बँकामध्ये आणि राष्ट्रीयकृत बँकामध्ये, अर्थसहाय्याच्या रक्कमीचे धनादेश पाठवून, निराधारांच्या खात्यामध्ये रक्कम वळती केलेली आहे. त्यामुळे निराधारांची दिवाळी गोड होणार आहे . याबद्दल महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी तहसिलदार धिरज मांजरे, त्यांचे सर्व सहकारी नायब तहसिलदार, संबधित संजय गांधी विभागाचे लिपीक वानखडे मॅडम व सर्वच कर्मचाऱ्याचे मनःपूर्वक आभार मानले असून त्यांना आणि सर्व दिव्यांग, वयोवृद्ध निराधार बंधु भगिनींना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.