कारंजा:गुरुदेव नगर कारंजा किशोर मानकर यांचे निवासस्थानी आजाद समाज पार्टीच्या कार्यकरत्यांची बैठक घेण्यात आली.बैठकिच्या अध्यक्ष स्थानी आजाद समाज पार्टीचे प.विदर्भ महासचिव किशोर मानकर होते तर प्रमुख अतिथी म्हणुन प्रा.अशोक खंडारे,के.व्ही.राउत,दिपक खंडारे ,दिलिप शेजव ,रंगराव गोपनारयण,पि.एम.भगत होते.
या प्रसंगी किशोर मानकर यांनी मिशनरी कार्यकर्ता गोरखनाथ वानखडे यांची आजाद समाज पार्टीचे कारंजा तालुका अध्यक्ष या पदावर
पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी तालुका अध्यक्ष व नवनियुक्त शहर अध्यक्ष अतीक खान यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी
ॲड भारत सावळे, ॲड पंकज सावळे, समाधान अढाव,गजानन भगत,धम्मानंद कांबळे, शहर अध्यक्ष अतिक खान ,मनोज ठोंबरे,खाडे साहेब यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.संचलन दिलिप शेजव यांनी केले तर आभार प्रदर्शन दिपक खंडारे यांनी केले .