चंद्रपूर : ट्रान्सपोर्ट व्यावसायिका कडून 1 लाख रुपये लाच स्वीकारताना अहेरीचा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिनांक 5 सप्टेंबर सोमवारी अटक केली. श्याम गोविंदराव गव्हाणे असे लाचखोर पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.
तक्रारदार हे मु. नागेपल्ली पोस्ट आलापल्ली तह. अहेरी जि. गडचिरोली येथील रहीवासी असुन वाहन ट्रन्सपोर्टचे काम करतो. तक्रारदार यांचेवर पो.स्टे. अहेरी जि. गडचिरोली येथे दाखल असलेल्या गुन्हयाच्या तपासामध्ये मदत करणेकरीता व तक्रारदार यांचे वाहन ट्रन्सपोर्ट वाहतुक सुरळीत चालू देण्याच्या कामाकरीता शाम गोविंदराव गव्हाणे, पोलीस निरीक्षक अहेरी यांनी तक्रारदाराकडे १,००,०००/-रु. ची मागणी केल्याचे तक्रारीवरुन आज दिनांक ०५/०९/२०२२ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी व सापळा कार्यवाही दरम्यान शाम गोविंदराव गव्हाणे, पोलीस निरीक्षक अहेरी यांनी तक्रारदाराकडे १,००,०००/- रु. लाचेची मागणी करुन पो.स्टे अहेरी आवारात उभी असलेले शासकिय वाहनामध्ये ठेवण्यास सांगीतले. त्यावरुन शाम गोविंदराव गव्हाणे, पोलीस निरीक्षक अहेरी यांना ताब्यात घेण्यात आले असुन पुढील तपास कार्य सुरु आहे.
सदरची कार्यवाही राकेश ओला, पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपुर, मधुकर गिते, अप्पर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक, अविनाश भामरे, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्रीमती शिल्पा भरडे, तसेच कार्यालयीन स्टॉफ नापोकॉ. नरेश नन्नावरे, संदेश वाघमारे, पो.अ. रविकुमार ढेंगळे, वैभव गाडगे व चा. पो. अं. सतिश सिडाम सर्व ला.प्र.वि. चंद्रपुर यांनी यशस्वी पार पाडली आहे.