कारंजा : १ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त व २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या सकारात्मक शपथ पत्राची प्रत संघटनेला देण्यात यावी, तसेच लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी,या संदर्भात वाशिम जिल्हा शिक्षण संघर्ष संघटेनेच्या वतीने मा. जिल्हाधिकारी वाशिम व माध्यमिक शिक्षणाधिकारी वाशिम यांना १४ जुलै २५ रोजी निवेदन देण्यात आले .
निवेदनात मागणी करण्यात आल्यानुसार सन १९८२ ची जुनी पेंशन लागु होण्याकरीता महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक शपथपत्र दाखल करण्यात न आल्यामुळे दि १४ व १५ जुलै २०२५ पासुन संघटनेच्या राज्यातील पेंशन पिडित बांधवांनी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला होता. परंतु अधिवेशन काळात मुंबई येथे संघटनेच्या अध्यक्षा डॉ सौ संगीता शिंदे बोंडे यांनी ८ जुलै रोजी शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांची भेट घेतली असता शासनातर्फे जुन्या पेन्शन बाबत सकारात्मक शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले असून लवकरच जुनी पेन्शन योजनेबाबत कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तसेच ७ व ८ जुलै रोजी आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनात शिष्टमंडळासोबत हाच पुनरुच्चार शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केला आहे.तसेच शिक्षण मंत्री मा. ना. पंकज भोयर यांनी सभागृहात सुद्धा असेच मत व्यक्त केले. परिणामी शिक्षण मंत्र्यांच्या शब्दाला मान देऊन दिनांक १४ व १५ जुलै रोजी चे नियोजित आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. परंतु या सकारात्मक शपथपत्रात नेमके काय असेल? हे जाणून घेण्याची उत्सुकता राज्यातील शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांना लागली आहे.तरी महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या सकारात्मक शपथपत्राची संघटनेला एक प्रत देण्यात यावी.तसेच जुनी पेन्शन योजना लवकरात लवकर लागू करावी.अन्यथा आमच्या पेन्शनची दखल न घेतल्यास 26000 प्राचार्य , मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे. निवेदनावर वाशिम जिल्ह्यातील शिक्षण संघर्ष संघटनाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कवर, जिल्हा सचिव नितेश भिंगे, जिल्हा कार्याध्यक्ष विजय भड, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण कदम,यांच्यासह एस के. सोनोणे, प्रवीण सोनीवाल, अरविंद ठाकरे,यू.एन खीराडे, देविदास घेगाटे, बंडूभाऊ टापरे, डी.एम बांडे, लक्ष्मण धाडवे, संतोष वानखडे, सुनील गवइ, एस.आर सुर्वे, विठ्ठल भिसडे,जी.जी गोटे, एस. एस ताजणे, साहेबराव भगत, जे.व्ही कबाडे, संजय वानखेडे आदि पेन्शनग्रस्त उपस्थित होते.