कारंजा (लाड) : नागपूर औरंगाबाद महामार्गावरील कारंजा(लाड) ते शेलुबाजार मार्गावरील पेडगाव जवळ आज सकाळी सहा वाजता तिहेरी अपघात झाला आहे.
सदर अपघात हा 21/6/2024 शुक्रवारला सकाळी सहा वाजताच्या सुमारास पेडगाव जवळ नागपूर पुना हायवे ढाब्या जवळ एका ट्रॅव्हल्सचा सदर अपघात हा प्रवासाच्या लघुशंकेसाठी ट्रॅव्हल्सही रोडच्या बाजूला उभी केली असता पुण्यावरून ट्रक नी येताना शेलु बाजार समोर नऊ किलोमीटर अंतरावर राजा ट्रॅव्हल्स M.P.13ZK 9119 ने येणारा ट्रक .MH 34 BG - 1015 याला समोरा समोर धडक दिली. असताना मागून येणारी सिंध ट्रॅव्हल्स MH 37 T 6777 समोर अपघात दिसल्यामुळे सिंध ट्रॅव्हल्स च्या ड्रायव्हरने हुशार की दाखवून त्या ट्रॅव्हल्स ड्रायव्हरने ट्रॅव्हल्स रोडच्या बाजूला घातले व बाजूला घातल्यामुळे त्या गाडीमधल्या प्रवाशाची सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.ट्रॅव्हल्स रोडच्या काठाला उतरली व राजा ट्रॅव्हल्स मधील प्रवासी 5
गंभीर जखमी तर 15जन किरकोळ जखमी झाले असा प्राथमिक अंदाज आहे.
अपघाताची माहिती मिळताच लोकेशन 108 कारंजा(लाड) पायलट किशोर खोडके व डॉक्टर अजय कुमार मिश्रा हे तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमी रुग्णाला उपजिल्हा रुग्णालय कारंजा (लाड) येथे आणले आणि प्रथमोपचार सुरू केले असुन समोरील तपास संबंधित डिपार्टमेंट करत आहे .