लाखनी पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून केलेल्या एका मोठ्या कारवाईत तब्बल ४ लक्ष ३५ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. १२६ खोक्यांमधून ही दारू नेण्यात येत होती. ही कारवाई काल मध्यरात्रीच्या सुमारास पोहरा-सेलोटी मार्गावर करण्यात आली. याप्रकरणी एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर भुमय्या मोहते (३६) मोहीनकुट्टा तेलंगाना, प्रवेश सिद्धार्थ मेश्राम (३२) विजय मदन गायधने (२३) गोपी अंजैया बुरा (३९) नीलिमा सुनील हटनागर व हनीफ रज्जाक तुरक (५०) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.