गोरेगाव माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून विनाकारण त्रास देणाऱ्या व माहिती न देण्याच्या ऐवजी पैसे मागणार्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना गोरेगाव पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये संजय रमेश बघेले राहणार सटवा डवा, लोकेश सोहनलाल कावळे राहणार मोहाडी तालुका गोरेगाव ,अजय कृष्णकुमार जायस्वाल गणेशनगर गोंदिया यांचा समावेश आहे.
गोरेगाव पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या गोवारी टोला येथील सुरेंद्र हेमराज रहांगडाले यांच्या कृषी केंद्र व धानाच्या गोदामांचे व घराचे सकाळी सात वाजेच्या सुमारास छायाचित्र काढून संजय रमेश बघेले राहणार सटवा डवा व लोकेश सोहनलाल कावळे राहणार मोहाडी तालुका गोरेगाव व अजय कृष्णकुमार जायस्वाल गणेशनगर गोंदिया यांनी आत मध्ये प्रवेश करीत असताना फिर्यादी सुरेंद्र हेमराज रहांगडाले यांनी अडवणूक केली असता आम्ही निस्वार्थ संस्थे अंतर्गत काम करतो .
आम्हाला अधिकार आहे असे बोलून फिर्यादीच्या गोदामात प्रवेश करून भीती दाखवली .तसेच फिर्यादीस ५ लाख रुपयाची खंडणीची मागणी केली .५ लाख रुपये खंडणी दिले नाही तर माहिती अधिकार अर्ज लावू.
आमच्या विरोधात पोलिसात तक्रार किंवा कारवाई केल्यास तुला जीवानिशी मारू .अशी धमकी दिल्याने फिर्यादीने आपल्या तोंडी तक्रारीत पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिस निरीक्षक यांच्या आदेशाने गैर अर्जदार आरोपी विरुद्ध तक्रार नोंदवून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे .दरम्यान फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये आरोपींनी आम्ही अण्णा हजारे यांचे माणसं आहोत आम्हाला धान खरेदी केंद्र व गोदाम तपासण्याचे अधिकार राज्य सरकारने दिले आहेत .
यापूर्वी कटंगी येथील रेखलाल टेंबरे यांचे धान खरेदी केंद्र बंद पाडण्याचे आम्हीच आहोत असे सांगत नाशिक येथील निस्वार्थ बहुउद्देशीय संस्था रजिस्टर नंबर१००२०५०३ अंतर्गत आम्ही काम करीत असल्याचे सांगितले. तुमचे गोदाम हे बेकायदेशीर आहे माहिती अधिकाराचा अर्ज लावून तुमच्यावर कारवाई करण्याकरता तक्रार करणार आहोत.
तक्रार होऊ द्यायची नसेल व हे प्रकरण येते संपवायचे असेल तर ५ लाख रुपये द्यावे लागतील असे धमकाविले. त्यामुळे गावातील नागरिकांनी व पोलिसांनी त्यांना पकडून गोरेगाव पोलीस ठाण्यात नेत असताना आमच्यावर पोलीस कारवाई झाली तर तुला जिवानिशी ठार मारू अशी धमकी दिल्याने आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार नोंदविली.
त्या तक्रारीच्या आधारे गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन मेहेत्रे यांनी दिली असून पुढील तपास विलास जाधव करीत आहेत .