चंद्रपूर ( जिल्हा प्रतिनिधी ): येथील वैद्यकीय महाविद्यालयात चार दिवसांच्या नवजात बाळाचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी ८ वाजतादरम्यान उघडकीस आली. या घटनेमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातील गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला असून, सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, शहर पोलिस दलाच्या सतर्कतेमुळे सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत बाळाची चोरी करणाऱ्या झेबा सुभान शेख (३१, रा. डांगरीपुरा, हिंगणघाट, जि. वर्धा) हिला अटक करुन बाळ ताब्यात घेतले आहे. बाळ सुखरूप असून, वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे
मीरा अंकित धात्रक (२२) या महिलेची १७ जून रोजी वरोरा तालुक्यातील प्राथमिक स्वास्थ्य केंद्र माढेळी येथे प्रसूती झाली. मात्र, बाळाचे वजन कमी असल्याने त्याला उपचारार्थ चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात वॉर्ड नंबर १५ मध्ये दाखल केले. उपचार सुरु असताना मंगळवारी सकाळी महिलेच्या शेजारी बाळ दिसेनासे झाले. सुरुवातीला नातेवाइकांनी बाळाला कोवळे उन्ह दाखवायला बाहेर नेले असेल असा मातेचा समज झाला. मात्र, नातेवाइकांनी बाळाला बाहेर नेले नसल्याचे स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली, सर्वत्र शोधाशोध करूनही बाळ आढळून आले नाही. त्यामुळे बाळाचे अपहरण झाल्याची
तक्रार पोलिसांत देण्यात आली. शहर पोलिसांनी लगेच रुग्णालय गाठून सीसीटीव्ही कॅमेरे तपासून त्या महिलेचा शोध घेत हिंगणघाट येऊन अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिस स्टेशनचे पीआय सतीश राजपूत यांच्या नेतृत्वात एपीआय मंगेश भोंगळे, पीआय पीएसआय शरीफ शेख, इम्रान शेख, पोलि खुशाल सावळे, सायबर पोलिस यांच्यासह वर्धा पोलिस अधीक्षक चंद्रपूर २ नरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक घेऊन ति सागर कवडे यांच्यासह एपीआय संदीप कापडे, विनीत घागे, वर्धा सायबर पोलिस, सीआयू युनिट आदींनी केली
पोलिसांनी कसा लावला तपास?
रविंद्रसिह परदेशी पोलीस अधिक्षक चंद्रपूर
शहर पोलिसात तक्रार होताच पोलिसांनी लगेच वैद्यकीय महाविद्यालय गाठले. यावेळी एक महिला बाळ घेऊन जाताना दिसून आले. ती महिला ज्या ऑटोमध्ये बसली त्या ऑटोचा शोध पोलिसांनी घेत त्याला विचारणा केली असता, त्याने त्या महिलेला बसस्थानकावर सोडल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या वेळेत कोणत्या बस सुटल्या याची माहिती घेतली. यावेळी वर्धाकडे बस गेल्याचे पोलिसांना कळले. पोलिसांचे एक पथक लगेच वर्धासाठी निघाले. तसेच याबाबत वर्धा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी बसच्या चालकाचा नंबर घेऊन त्यांना याबाबत माहिती विचारली असता, ती महिला हिंगणघाट येथे उतरली असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या महिलेने संपर्क साधलेल्या मोबाइलची लोकेशन काढून तेथे पोहोचल्यानंतर ती महिला तेथे आढळून आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
पोलिस अधीक्षकांकडून तपास चमूचा सत्कार
चंद्रपूर शहर पोलिसांनी काही तापास अपहरण केलेल्या महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडून बाळ सुखरुप त्या मातेस परत केले. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतिश राजपुत, सपोनि मंगेश भोंगळे यांच्यासह संपूर्ण चमूचा सत्कार केला.
आपल्या प्रतिक्रिया द्या....