कारंजा : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून यामध्ये कारंजा शहरातील नामांकित असलेल्या,जे.डी.चवरे विद्यामंदिरच्या इयत्ता ५ वी चे ४ तर ८ वी चे ५ विद्यार्थी असे एकूण ९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत.
इयत्ता पाचवीची कु. स्निग्द्या राहूल आखाडे ( २७ वी मेरिट ) ही शाळेतून सर्वप्रथम आली आहे. इतर विद्यार्थी याप्रमाणे:- ओवी महेश काकड ( ३० वी मेरीट), स्वानंद अभिजीत देशपांडे ( ४२ वा मेरीट), कु. यशश्री विनोद दाभाडे ( ६१ वी मेरीट) तसेच वर्ग ८ वी मधून शाळेतून सर्वप्रथम निकुंज शरद जयस्वाल ( १४ वा मेरीट), लोकेश मनोज राठोड ( २३ वा मेरीट), कु. खानसा फिरदोस शाहनवाझ खान ( ३० वी मेरीट), कु. प्रीती सचिन वानखेडे (३८ वी मेरीट), पार्थ गणेश पोहाने (मागासवर्ग प्रवर्गातून १ ला मेरीट)
शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी होण्यासाठी राहुल आखाडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याकरिता शाळेकडून विशेष वर्गाची व्यवस्था करण्यात आली होती.या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशासाठी शाळेचे व्यवस्थापक मंडळ, मुख्याध्यापक श्रीनिवास जोशी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. असे वृत्त संस्थेकडून मिळाल्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.