प्रचलित प्रक्रियेनुसार शेतकऱ्यांना शेतीचा सातबारा, नमुना आठ मिळण्यासाठी शासन आदेशानुसार ई-पीक पाहणी प्रक्रिया करण्यात येते. त्यानंतर शेतकऱ्यांनी मोबाईल वरून भरलेली माहिती ई-पीक पाहणी ॲपवर अपलोड होते. मात्र, सदर माहिती तलाठी यांचेकडे पोहचत नसल्या कारणास्तव ई - पीक पाहणी अभावी तलाठ्याकडून शेतकऱ्याला सातबारा मिळत नसल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची कुचंबना होत आहे. परिणामी, तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी बांधवांना सातबारा व नमुना आठ उतारा न मिळाल्यामुळे हे शेतकरी बांधव आधारभूत धान खरेदी नोंदणी करण्यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे शासनाने ई - पीक पाहणी ॲप मधील त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेतीचा सातबारा व नमुना आठ उतारा उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेनेचे चिमूर विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हाप्रमुख प्रा.अमृत नखाते यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना तहसिलदार उषा चौधरी यांच्या वतीने निवेदन प्रेषित करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे उपतालुका तथा सोंदरी चे सरपंच केवळरामजी पारधी, डॉ. रामेश्वर राखडे, शामराव भानारकर माजी शहरप्रमुख, अनिरुद्ध राऊत, गुलाब बागडे विभाग प्रमुख खेडमक्ता, रमाकांत अरगेलवार, प्रकाश देशमुख, विजय देशमुख, सुभाष मेश्राम, महादेव तिघरे, बाबुराव ठोंबरे, नारायण भाजीपाले, रमेश ठोंबरे, पंढरी गभने, युवराज कांबळी, प्रभाकर दोनाडकर आदीं. शिवसैनिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.