अकोला :
मानवसेवा हीच ईश्वरसेवा मानणाऱ्या हरणे कुटुंबियांनी देहदान व नेत्रदानाचा संकल्प करून समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. समाजसेवेसाठी ओळखले जाणारे गजानन ओंकारराव हरणे उर्फ अण्णा आणि त्यांच्या पत्नी सौ. युगेश्वरी हरणे (मा. पंचायत समिती सदस्य, अकोला) यांनी अकोला येथील सरकारी सर्वोपचार रुग्णालयात आवश्यक ती कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून आपले संपूर्ण शरीर आणि नेत्र दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
गजानन हरणे यांना समाजसेवेची लागलेली नाळ पिढीजात लाभलेली असून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कार्यकुशलतेने ठसा उमटवला आहे. प्रत्येक वर्षी ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान करतात. यावर्षी त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने आणखी पुढे जात, देहदान व नेत्रदानाचा संकल्प करून समाजसेवेच्या कार्यात एक नवा अध्याय जोडला आहे.
मानवतेचा खरा अर्थ देहदानात:
हरणे कुटुंबियांचा हा संकल्प फक्त रक्तदानापुरताच मर्यादित न राहता त्यांनी आपले अनमोल नेत्र आणि संपूर्ण शरीर मृत्युपश्चात वैद्यकीय शिक्षण आणि गरजूंना लाभ मिळावा म्हणून समाजाला समर्पित केले आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील नवोदित डॉक्टरांना मानवी शरीररचनेचा अभ्यास करता येईल तसेच इतर रुग्णांच्या उपचारासाठी उपयुक्त अवयव वापरता येणार आहेत.
गजानन हरणे म्हणाले, “माणूस मरणानंतरही उपयुक्त ठरावा, हीच खरी जीवनपर्वाची पूर्तता आणि मोक्षप्राप्ती आहे. मृत्यूनंतर केवळ रुढी-परंपरा आणि धार्मिक विधींनी काही काळासाठी आठवणी शिल्लक राहतात, परंतु देहदानाच्या माध्यमातून अमरत्व मिळवता येते.”
समाजासाठी प्रेरणास्थान:
हरणे कुटुंबियांचा हा निर्धार केवळ वैयक्तिक नव्हे, तर सामाजिक क्रांतीचा एक भाग आहे. त्यांनी देहदानाच्या माध्यमातून समाजाला एक सशक्त संदेश दिला आहे — "मरणानंतरही मानवतेच्या सेवेसाठी जिवंत राहता येते."
या कृतीतून त्यांनी समस्त समाजाला आवाहन केले आहे की, आपण सुद्धा पुढे येऊन नेत्रदान, रक्तदान आणि देहदानाचा संकल्प करावा, हीच खरी ईश्वरसेवा आणि जीवनाचे सार्थक साध्य करण्याची दिशा आहे.
बऱ्याच वर्षां नंतर मेडिकल कॉलेज पाहाण्या करिता गेलो होतो. सर्व विभाग पाहिल्यावर एका दालनात प्रवेश केला. तो शरीर-विच्छेदन विभाग होता. विस्तीर्ण अशा त्या दालनात बरेच टेबल ठेवले होते. त्यातील काही टेबलांवर मानवी शरीरे मृता वस्थेत पडली होती. दालनात औषधी द्रव्यांचा उग्र वास येत होता. मन थोडे चरकले, पण हिमत करून मी त्या शरीरांना जवळून निरखले. अनेक रोगांनी पीडित अशी ती मृत मानवी शरीरं पाहून मन व्यथित झाले. मी डॉक्टरांना विचारले, "विद्यार्थी अशा रोग जर्जर शरीरांचे विच्छेदन करून त्यांच्यावर अभ्यास करतात. चांगली सुदृढ शरीर का नाही अभ्यासासाठी वापरीत?" तेव्हा ते म्हणाले की, "चांगल्या सुखसंपन्न घराण्यांतून महाविद्यालयाला शरीर दान कोणी करीत नाही. दान केलेच तर ते प्रमाण फारच अल्प आहे. तेव्हा आम्हाला अशी अनेक व्याधींनी ग्रम्त, रस्त्यावर अथवा रुग्णालयात मृत झालेली, बेवारस घोषित करण्यात आलेली शरीरच अध्ययन करण्याकरिता वापरावी लागतात. त्याला आमचा नाइलाज आहे. हे सर्व पाहून मी माझे व माझ्या पत्नीचे दोघांचे इच्छापत्र मेडिकल कॉलेज अकोला येथे सादर केले आहे. आपल्या मृत्यूनंतर आपले शरीर जाळण्या पेक्षा ते शरीर जर कामात येत असेल त्यामधून पुढील चांगले डॉक्टर घडू शकत असतील व त्या माध्यमातून मानवी शरीराचा अभ्यास करून नवीन काही संशोधन होऊन मानवाच्या हाती काही चांगल्या गोष्टी लागत असतील तर ते संपूर्ण विश्वासाठी फायद्याचे ठरणार आहे. म्हणून मग मी व माझ्या पत्नी आम्ही दोघांनी
त्याच क्षणी मी निर्णय घेतला की, मी माझे शरीर मृत्युनंतर मेडिकल कॉलेजच्या शरीरशास्त्र विभागाला दान करीन अथवा माझा मृत्यू ज्या गावी होईल तेथून जवळ असलेल्या मेडिकल कॉलेजला ते दान करीन तशा पद्धतीची शासकीय प्रक्रिया अकोला मेडिकल कॉलेजला मी व माझ्या पत्नीने करून घेतली आहे.
मृतदेहाचे दान करा!
वेळोवेळी वृत्तपत्रांमधून भिन्नभिन्न वैद्यकीय महाविद्यालयांद्वारे, विद्यार्थ्यांच्या शरीरशास्त्र अभ्यासारिता, मानवी मृत देह दान करण्याचे आवाहन करण्यात येते, परंतु या विनंतीस समाजाकडून योग्य तो प्रतिमाद पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. असे म्हटले जाते, परंतु या डॉक्टरी व्यवसायाला सध्या व्यापारी स्वरूप आले आहे.हे अमान्य करून चालणार नाही. डॉक्टरांच्या 'कन्सल्टिंग'चा तदनंतरच्या विविध तपासणींचा व औषधोपचारांचा खर्चच इतका असतो की, रुग्ण सर्व दिव्यातून जाताना अर्धा-अधिक खतम होतो. जो काही उरतो, त्यात तो पूर्णतः बरा होऊन समाजात वावरेल याची शासवती एकही डॉक्टर देत नाही असो.नेत्रदान करण्यात यावे, ही देखील इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. भविष्यात मूत्रपिंड (Kidney) दानाची व्यवस्था आली, तर तेही दान करण्याची शासकीय मेडिकल कॉलेजच्या तत्कालीन इच्छा मी व्यक्त करीन. माझे ते इच्छापत्र, संबंधित विभागाकडे आम्ही उभयतांनी जाऊन सुपूर्द केले. तदनंतर त्या विशिष्ट विभागाकडून मला, माझ्या इच्छापत्राची पोच सन्मानपत्र व मृत शरीरदानासंबंधी छापील नियमावली मिळाली. ती पुढील प्रमाणे ते नियम खाली देत आहे.त्यातील नियम सर्वाच्या माहितीसाठी अशाच व्यक्तीचेच शरीर स्वीकारले जाते. जी व्यक्ती फक्त नैसर्गिक रीतीने मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे शरीर स्वीकारला जाते. जसे खून, आत्महत्या अथवा अपघात यांनी मृत्यू पावलेल्यांचे शरीर स्वीकारले जात नाही.
वारसाहक्क प्राप्त झालेल्या व्यक्तींनी नैसर्गिक मृत्यू आलेल्या व्यक्तीचा मेडिकल कॉलेजच्या शवविच्छेदन विभागाला द्यावयाच्या विनति पत्रासोबत पोलिस विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
शरीरदान करणाऱ्या व्यक्तीने केलेल्या इच्छापत्राची प्रत मेडिकल कॉलेजला द्यावयाच्या माहिती पत्रा सोबत जोडणे आवश्यक आहे. मृत व्यक्तीच्या अतिजवळच्या अथवा वारसा हक्काने त्याच्या मिळकतीवर हक्क असणाऱ्या दोन व्यक्तींचे ना-हरकत पत्र मेडिकल कॉलेजला पाठवण्यात येणाऱ्या विनंती पत्रास जोडण आवश्यक आहे. मृत व्यक्तीचा वारसा हक्क प्राप्त झालेल्या व्यक्तीने मेडिकल कॉलेजला मृत शरीर स्वीकारण्याची विनंती करावी.
दान केलेले मृत शरीर शक्य तितक्या लवकर मेडिकल कॉलेजच्या शरीर शास्त्र विभागाकडे रवाना करण्यात यावे जेणे करून त्याचा शवविच्छेदन विभागान्ना काही उपयोग होऊ शकेल. मृत्यू झाल्याच्या जागे पासून मेडिकल कॉलेजच्या शर्वावच्छेदन विभागापर्यंत शव पोचविण्याची जबाबदारी दान्याच्या निकट-च्या आप्तेष्टांची वारसाची राहील.
उपरोक्त नियम मान्य असल्यासंवंधीच्या पत्राच्या प्रती व इतर आवश्यक पत्रव्यवहार, प्राध्यापक, शरीरशास्त्र विभाग, शासकीय मेडिकल कॉलेज यांच्याशी प्राचार्याच्या मार्फत करावा.बराच खटाटोप, मोठेच दीव्य या सर्व नियमा वर दृष्टिक्षेप टाकल्यावर मृत शरीराचे दान करणे बरेच कष्टाचे वाटतात आहे. मृत व्यक्तीच्या नातेवाईकाना वारसा हक्क प्राप्त असलेला व्यक्ती समोरासमोर उभा करावा लागतो. बऱ्याच कायदेशीर दिव्यातून जावे लागते हे लक्षात येत.तेव्हा माझी शासनाला नम्र नम्र एवढीच विनंती आहे की मृत शरीर दान करण्याची भावना जर समाजात रुजवायची व लोकप्रिय करावयाची असेल तर संबंधित नियमात शिथिलता आणावी हे दान देखील इतर दानांप्रमाणेच सुलभ व लोकप्रिय करण्याकरता शासनाने काही नियम शितील किंवा बदल करावे. मानवी शरीरांची मेडिकलच्या विद्यार्थ्यांना अध्ययनाकरिता नितांत आवश्यकता आहे, ही बाब शासनाने विसरू नये.
अभ्यास झाल्यावर दहन करा!
स्थानिक शासकीय मेडिकल कॉलेजच्या संबंधित विभागाने फक्त एवढी काळजी घ्यावी की शव विच्छेदन करून अभ्यास झाल्यावर त्या शरीराचे अथवा त्या शरीरांच्या विविध अंगांचे दहन अथवा दफन करावे. त्या मागे मृत व्यक्तीच्या निकटच्या लोकांच्या भावना असतात. त्यांना तडा जाता कामा नये.
बरेच वेळा मी विविध व्यक्तींशी चर्चा केले की, त्यात सर्वच दानांचा समावेश होतो. चर्चेत असे आढळून आले की, मृत शरीर दान बाबत अनेक गैरसमज आहे. नेत्रदान हे मृत्यूनंतर ६ तासाच्या आत करावयाचे असते. मूत्रपिंड (किडनी) दान हे ताबडतोब करावयाचे असते. म्हणजे त्यासाठी दांत्याचा मृत्यु संर्वोधन झाल्यावर मृत शरीर लवकरात लवकर रुग्णालयात जाने किंवा त्याच ठिकाणी मृत्यू होणे आवश्यक आहे. अशा प्रकारे संबंधित विभागाला कडून शरीर अभ्यासाच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे देहदान करावे.
श्रीलंकेत फार महत्त्व..!
येथे उल्लेखित सर्व दान दात्याने मृत्यूपर्वी इच्छापत्र करून, जवळच्या आप्तेष्टांना ,वारसांना व फौमेली डॉक्टरांना त्यासंबंधी कल्पना देऊन करावयाची असतात.कारण दात्याच्या मृत्युच्या पश्चात 'ते' सर्व व्यवहार संबंधित वारसा हक्क प्राप्त नातेवाईकांनी व डॉक्टरांनी पार पाडावयाचे असतात. काही गैरसमज व जूनाट विचार प्रचलित असतात रूढी परंपरेला तिलांजली देणे काळाची गरज आहे.सर्व सामान्य समाजात ह्या संबंधी ज्या काही अंधश्रद्धा आहेत. त्यांच्याकडे नव्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहाण्याची नितांत आवश्यकता आहे.
त्यामुळे श्रीलंके सोबत इतर प्रगट राष्ट्रांमध्ये नेत्रदान व शरीरदान करण्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. भारतात फक्त नेत्रदानाचाच विचार केला तर आज अंदाजे ५० लाख अंधाना नेत्रदानाची आवश्यकता आहे. परंतु, आपण बहुमोल असे नेत्र रोज शेकडोंच्या प्रमाणात त्याचा मेंदू शरीर कोणत्याही मागचा पुढचा विचार न करता कारण नसताना जाळून टाकतो. मानवी रक्त, डोळे अवयव कार्यशाळेत निर्माण करता येत नाहीत. ही मग ही इंश्वराची, निसर्गाची निर्मिती आहे. हा आपल्या हक्काचा बहुमोल ठेवा मातीमोल करू नका. या संबंधित मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. तसेच शिकल्या सवरल्या लोकांनी या जन अभियानात पुढे येऊन स्वतःहून सहभाग घेणे खूप आवश्यक आहे. तरच खऱ्या अर्थाने अवयदान अभियानाला महत्व येईल. हे अभियान यशस्वी होवू शकते. मी अवयव दान केले आपण सुद्धा अवय दान करून राष्ट्रीय कार्यास हातभार लावा ही जागरूक नागरिकांना मना पासून नम्र विनंती.
गजानन कुसुम ओंकार हरणे
,समाजसेवक , समाजसुधारक, साहित्यिक,लेखक ,कवी ,वक्ता, विश्लेषक, प्रचारक.
संयोजक,निर्भय बनो जन आंदोलन.
आपल्या प्रतिक्रिया द्या....