कारंजा : अचानक आलेल्या मुसळधार पावसाने,श्री कामाक्षा देवी मंदिर परिसरात राहणाऱ्या दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांच्या झोपडीवजा मातीच्या घरात पाणीच पाणी शिरले असून त्यामुळे त्यांच्या घराला धोका निर्माण झालेला आहे.कारंजा नगर पालिकेने श्री कामाक्षा सभागृह बांधकाम करतांना त्यांच्या घराचे पावसाचे पाणी निघण्याची मुळ वाट बंद केल्याने, पावसाचे पाणी जायला जागाच नसल्याने हा प्रताप घडल्याचा आरोप संजय कडोळे यांनी केला असून,नगर पालिकेने आपणास घरकुल उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.