कारंजा : शिवछत्रपती शिवाजी महाराज आदर्श समाजसेवक राज्यस्तरिय पुरस्कार प्राप्त गोपाल विश्वनाथ गावंडे यांच्या अचूक अंदाजांप्रमाणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अख्ख्या महाराष्ट्र, पूर्व विदर्भासह यवतमाळ वाशिम जिल्ह्यालाही अवकाळीचे वारेवादळ,गारपिट आणि पावसाचा चांगलाच तडाखा बसलेला असून, गोपाल गावंडे यांनी दिलेल्या पुर्वानुमान अंदाजामुळे ग्रामस्थ शेतकऱ्यांना सतर्क होण्याची संधी मिळाली असली तरी सुद्धा रविवारी सोमवारी दि.14 व 15 एप्रिलच्या मध्यरात्री व तत्पूर्वी गेल्या महिनाभरात कधीमधी झालेल्या अवकाळी पावसाने अनेक भागात उन्हाळी पिकांना,भाजीपाला फळ बागा इत्यादीचे चांगलेच नुकसान झाले आहे.त्यामुळे, निवडणूकाच्या व्यस्त कार्यक्रमातून,शेतकऱ्यासाठी सुद्धा वेळ काढून स्थानिक जिल्हाधिकारी,तहसिलदार आणि मंडल अधिकारी यांनी ताबडतोब शेतीच्या बांधावर जाऊन, नुकसान झालेल्या शेतमालाचे पंचनामे करून या मायबाप शासनाने सरसकट नुकसान भरपाई,पिकविम्याची रक्कम व पुढील हंगामा करीता,बॅकांमार्फत अविलंब कर्जपुरवठा,बि बियाणे व खताची उपलब्धता तात्काळ करून देणे अत्यावश्यक असून तशी मागणी शेतकऱ्याकडून होत असल्याने शासन प्रशासनाने अविलंब दखल घेणे गरजेचे आहे.तसेच यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणूकीच्या उमेद्वारांनी सुद्धा निवडणूकीच्या प्रचारामधून वेळ काढून, जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी शेतमजूरांच्या वेदना समजून घेत तुमचे मतदार शेतकरी बांधवाना काय सहकार्य करता येईल याचाही विचार केला पाहिजे असे निर्भिड व परखड मत दिव्यांग जनसेवक तथा आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी व्यक्त केले आहे.अन्यथा शेतकरीराजा,सत्ताधारी व लोकप्रतिनिधीला डावलण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त मिळाल्याचेही त्यांनी कळवीले आहे.