भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती आरमोरी येथील माजी आ. आनंदराव गेडाम यांच्या कार्यालयात साजरी करण्यात आले.
यावेळी माजी आ. आनंदराव गेडाम यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्यमाला अर्पण करुन अभिवादन केले. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रांत स्व. राजीव गांधी यांचे मोठे योगदान होते. एक दूरदृष्टी असलेला नेता म्हणून राजीव गांधी यांचे नाव घेतले जाते. राजीव गांधी यांचे कार्य नव्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार माजी आ आनंदराव गेडाम यांनी केले.
कार्यक्रमाला सत्यवान वाघाडे, युवक कांग्रेसचे तालुका अध्यक्ष अंकुश गाढवे,दत्तू सोमनकर, हीवराज बोरकर, भुपेश वाकडे, भोलानाथ धानोरकर, कवळू ठाकरे, साबीर शेख, गोलू वाघरे, प्रजत गजबे,धीरज पुराम, काशिनाथ पोटफोडे, व अन्य कांग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.