ट्रक ने स्कूटी स्वाराला मागेहून धडक दिल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
एका ट्रक ने स्कुटी स्वार मृतक कुणाल गजानन डबरे (३६) याला मागेहून जब्बर धडक दिल्याने दिल्याने ट्रकच्या मागील चाकात कुणाल आल्याने कुणालच्या डोक्यावरून चाक गेल्याने कुणाल चा जागीच, मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे की,विसापूर रेल्वे गेट जवळ राहणाऱ्या गजानन डबरे व मुलगा कुणाल डबरे दोघेही रेलवे स्टेशन ला आपल्या मुलाला पोहचविण्यासाठी घरून निघाले, असतां बल्लारपूर येथील काटा गेट समोरील वळण मार्गावर वाघमारे किराणा समोर सचिन जैन लिहलेल्या ट्रक क्र, MH-34-AV-0994 या ट्रक ने स्कुटी ला मागून धडक दिल्याने बाप - मुलगा रोड चा दोन्ही बाजूंनी पडले त्यात मुलगा कुणाल चा डोक्यावरून ट्रक चा मागील चाक गेल्यामूळ संपूर्ण मस्तिष्क बाहेर निघाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. एका बापा समोरच मुलाचा मृत्यू झाल्याने बापावर तर वीजच कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले व मृतक ला शवविच्छेदना करिता ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले.
पोलिसांनी ट्रक व ट्रक ड्राइवर ला ताब्यात घेतले आहे, चंद्रपूर वरून बल्लारपूर कडे येत असताना नेहमीच काटा गेट मोडीवर अपघात होतात इथे बल्लारपूर पेपर मिल मध्ये जाणाऱ्या ट्रक नेहमी या परिसरात तसेच राज्य महामार्गावर उभे असतात या कारणाने सुद्धा या ठिकाणी अपघात होतात.