वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) धार्मिक अल्पसंख्यांक विदयार्थी बहूल शासनमान्य खाजगी शाळा,कनिष्ठ महाविदयालये,औदयोगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी अटी व शर्तीनुसार राबविण्यात येत आहे.
जिल्हयातील अल्पसंख्यांक विदयार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा,कनिष्ठ महाविदयालये, औदयोगिक प्रशिक्षण संस्था व दिव्यांग शाळांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव नियोजन विभाग,जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे कार्यालयीन वेळेत 30 जून 2023 पर्यत सादर करावेत.
प्रस्तावासोबत पुढील कागदपत्रे / प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे.प्रतिज्ञापत्र (स्वयंसाक्षांकित),सदस्यांची यादी,
शाळेचा /औ.प्र.सं. /अपंग शाळेचा DIES /Institute / License Code, पटसंख्येचा दाखला
(70% अल्पसंख्यांक विदयार्थी असल्याबाबत),पटसंख्या -प्रत्यक्ष उपस्थित विदयार्थी संख्या व टक्केवारी नमूद करावी.आगावू पावती,ट्रस्ट डीडची सत्यप्रत,धर्मदाय आयुक्ताकडून प्राप्त अनुसूची किंवा
फेरफार अहवालाची प्रत (अनूसूची ),
नोंदणी प्रमाणपत्राची सत्यप्रत, नोंदणी क्रमांक व वर्ष नमूद करावे.
शाळेला शासनाने प्रदान केलेल्या मान्यतेची प्रत(तपशील नमूद करावा अनुदानित/विना अनुदानित/कायम विना अनुदानित ),पी.आ.कार्ड / गाव नमुना 7/12 उतारा,भाडे पावती,
वार्षिक लेखे अहवाल (लगतच्या मागील चारपैकी 3 वर्षाचे),दर पत्रकाची प्रत,अंदाजपत्रक (बांधकामाकरीता मागणी केली असल्यास),इमारतीचे छायाचित्र,
मागणीची एकूण रक्कम व सुविधांचे स्वरुप,यापूर्वी निधी कोणकोणत्या सुविधांसाठी देण्यात आलेला आहे .
वर्षनिहाय निधीचा तपशील,यापूर्वी निधी दिला असल्यास त्याची उपयोगिता प्रमाणपत्रे,वर्षनिहाय तपशील नमूद करावा.असे जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे यांनी कळविले आहे. असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला मिळाल्याचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....