कारंजा (लाड) : विधानसभा निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळल्यापासून, कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाच्या कर्तबगार महिला आमदार माईसाहेब श्रीमती सईताई डहाके,ह्या अजिबात न थांबता सातत्याने,विधानसभेत आणि मंत्रालयात मुख्यमंत्री मा. देवेन्द्रजी फडणवीस यांचेकडे,आपल्या कारंजा मानोरा मतदार संघाच्या समस्या,मांडत असतात.त्यातही महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांप्रती त्या अधिक जागरूक असल्याचे वेळोवळी दिसून येत आहे.आज त्या सत्ताधारी पक्षाच्या महिला आमदार आहेत.त्यामुळे त्यांच्या माध्यमातून कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या विकासाला निश्चितच गती मिळणार असून कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या सर्वच समस्या निकाली निघणार. ही 'काळ्या दगडावरील पांढरी रेघ' असल्याचा मला विश्वास असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी व्यक्त केले आहे.त्यांना आमदार कार्यालयातून मिळालेल्या माहितीवरून आज दि. ३१ मे २०२५ रोजी आमदार माईसाहेब श्रीमती सईताई डहाके यांनी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांची नागपूर येथील शासकीय निवासस्थान 'रामगिरी' येथे, कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासाठी सौजन्य भेट घेतली.या भेटीदरम्यान त्यांनी कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत मुखमंत्री मा. देवेन्द्रजी फडणवीस यांचेशी सविस्तर चर्चा केली.त्यामध्ये मुख्यत्वे,वैनगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पात,कारंजा मानोरा तालुक्याचा समावेश करणे,वाशीम नरखेड रेल्वे मार्ग सुरू करणे.तसेच स्थानिक प्रश्न,प्रलंबित प्रकल्प तसेच नव्याने राबविण्यात येणाऱ्या योजनांवर त्यांनी सकारात्मक चर्चा केली.मुख्यमंत्री मा. देवेन्द्रजी फडणवीस यांचेकडूनही चांगला प्रतिसाद मिळालेला असल्याची माहिती आहे.या भेटी दरम्यान कारंजा येथील भाजपाचे युवा नेते देवव्रत डहाके हे सुद्धा उपस्थित होते.मुख्यमंत्री मा.देवेन्द्रजीनी विकासकामांसाठी आवश्यक सहकार्याचे आश्वासन दिले. त्यांच्या आजच्या भेटी दरम्यान झालेल्या विस्तृत चर्चेमुळे मतदारसंघातील विकासाला नवसंजीवनी मिळेल,असा विश्वास सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत असल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.