कारंजा (लाड) (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : गेल्या दोन महिन्यांपूर्वी कारंजा तहसिल कार्यालयात पदस्थापना झालेल्या पिठासिन तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी अल्पावधीतच कारंजेकर नागरीकांच्या हृदय पटलावर आपल्या कार्यतत्परतेने स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना,अखिल भारतिय नाट्य परिषद, आदर्श जय भारत सेवाभावी संस्था, ईरो फिल्मस् एन्टरटेन्टमेन्ट कारंजाच्या वतीने लोककलावंत नंदकिशोर कव्हळकर,डॉ ज्ञानेश्वर गरड, मोहीत जोहरापूरकर,रोमिल लाठीया यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांना वाढदिवसाच्या व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या असता,कुणाल झाल्टे यांनी कारंजा तालुक्यातील नागरिकां प्रमाणे जीवाभावाची माणसं मला प्रथमच मिळाली असल्याचे कबूल करीत,मी कारंजेकराच्या सेवेत चोवीस तास कार्यरत राहणार असल्याचे विश्वासाने सांगीतले असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा लोककलावंत संजय कडोळे यांनी कळवीले आहे.