उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी दिव्यांग तपासणी आणि प्रमाणपत्र काढण्यात यावे, यासाठी दिनांक 20/8/2024 ला, आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा. यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2021 मध्ये विदर्भ दिव्यांग संघटनेची स्थापना करण्यात आली. ही संघटना दिव्यांग व्यक्तीचा शोध घेणे, त्यांच्या मिटिंग लावून असलेल्या योजनांची माहिती घेणे, शासन स्तरावर असलेल्या योजना तळागाळा पर्यंत पोहचविणे, त्यांचे अधिकार त्यांना मिळावे म्हणून शासन यंत्रणा यांच्या समन्वयामध्ये राहून दिव्यांग व्यक्तीचे जाणीव-जागृती कार्यक्रम घेणे, दिव्यांग लोकांमध्ये जागरूकता आणण्याचे काम ही संघटना दिव्यांग लोकांना घेऊन करीत आहे. दिव्यांग लोकांसाठी विदर्भाच्या स्तरावर काम करीत असताना, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी आणि नागभीड तालुक्यातील बैठकाच्या माध्यमातून लोकांकडून आलेली समस्या. दिव्यांग लोकांना प्रमाणपत्र काढण्यासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जाणे शक्य नाही, दिव्यांगत्व आणि दिव्यागत्वाची तीव्रता असलेले लोक जाऊ शकत नाही. हा संदर्भ घेऊन शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन मा. विनय गौडा जिल्हाधिकारी, जिल्हा कार्यालय चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले,
दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 28 डिसेंबर 2016 नुसार दिव्यांगत्व तपासणी,
मूल्यमापन व प्रमाणपत्र वितरणाच्या मार्गदर्शक सूचनानुसार, मार्गदर्शक सूचना नंबर ड. नुसार दिव्यांग व्यक्तीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी जिल्हा रुग्णालयासाठी बुधवार आणि उपजिल्हा रुग्णालयासाठी शुक्रवार जसा निश्चित केलेला आहे, पण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अस होताना दिसत नाही. चंद्रपूर जिल्ह्याचे ब्रम्हपुरी आणि नागभीड हे दोन्ही तालुके जिल्हा स्थळापासून खूप लांब असल्यामुळे 21 प्रकारच्या दिव्यांग लोकांना परिचलनातील अडचणी, आर्थिक अडचण, दुर्मिळ व्यंगत्व असलेले लोक, प्रवासातील अडचणी आणि प्रवासी साधनाचा अभाव, यामुळे जिल्हा स्तरांपर्यंत येऊन आपले प्रमाणपत्र काढून शकत नाही. तसेच जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये तयार झालेले प्रमाणपत्र एक ते दोन महिन्याच्या कालावधीने लोकांपर्यंत पोहचत असल्यामुळे बरेच लोक शासनाच्या योजनेपासून वंचित राहतात. या सबंधित बाबीवर जिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून चंद्रपूर जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी महिन्यातील एक दिवस दिव्यांगत्व तपासणी आणि प्रमाणपत्र काढण्याचे शिबीर लावून दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र प्रदान करावे. अशी चर्चा मा. महोदयासोबत करताना. विदर्भ विकलांग संघटनेचे अध्यक्ष, यशवंत पाटणकर, विकलांग व्यक्तीचे अधिकार विषय समन्वयक, संगिता तुमडे. नागभीड तालुका दिव्यांग संघटना अध्यक्ष, तुलोपचंद गेडाम, दयालसिंग जुनी, मंगला अगडे एकता दिव्यांग संघटना तालुका ब्रम्हपुरीचे अध्यक्ष, मनमौजी भाणारकर, सुभाष सहारे, अनिता बावनकर इत्यादीच्या उपस्थिती मध्ये निवेदन सादर करण्यात आले.