दि. ०९/१२/२०२४ रोजी संताजी कॉन्व्हेंट मध्ये जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ मा.श्री माणिकरावजी नालट, प्रमुख सत्कारमूर्ती संताजी सेनेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मा. मनोज भाऊ जुमळे, महानगर अध्यक्ष मा. ॲड. देवाशिष काकड (भा. ज. प. अकोला महानगर सचिव), प्रमुख पाहुणे म्हणून भा. ज. पा. अध्यक्ष अकोट मा. योगेश भाऊ गोतमारे, संस्थेचे सर्वेसर्वा मा.श्री श्रीधरजी वानखडे, संस्थाध्यक्ष मा.श्री मंगेशजी वानखडे, मा. संजय भाऊ जसनपुरे, मा. श्रीकांत धनबर, मा. पिंटू अंबरथे, मा. राहुल धनबर, मा. विश्वनाथ भागवत उपस्थित होते.
मा. माणिकरावजी नालट यांनी श्री संताजी महाराज जीवनावर प्रकाश टाकला.
श्री संताजी कॉन्व्हेंट मधील इयत्ता १ ली माही मोरे, समृद्धी सोनटक्के, रुद्र घोडके, ओम मुदगल, इयत्ता ५ वी चे श्रेया नागलकर, विद्या बावणे, अनन्या मानकर यांनी भाषणाद्वारे संताजी महाराजांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अपर्णा देशमुख यांनी केले.
अशाप्रकारे सर्वांच्या सकारात्मक प्रतिसादातून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.