पतंजली योग समिती परिवार आरमोरी तर्फे श्रीराम नवमी जन्मोत्सव साजरा करण्यात आला . सुदृढ आरोग्यासाठी , परिसर शुद्धीसाठी , योग प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी रामनवमी निमित्याने यज्ञ व हवन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . यावेळी पतंजली योगसमितीचे जि.प्रभारी सत्यनारायण चकिनारपुवार यांनी जीवनात यशस्वीतेसाठी आपल्या कार्यात अखंडता व निरंतरता असावी , योग व प्राणायामाने मन प्रसन्न एकाग्र व शांत होते असे सांगीतले.
यावेळी डॉ .राम राऊत , जि . संवाद प्रभारी प्रभाकर गडपायले , जि.सह. युवा प्रभारी धनराज कांबळे , महामंत्री राजश्री राऊत , महिला संवाद प्र . सिंधू कोरडे , ज्योती खेवले मा . मिडीया प्रमुख मनिषा मस्के , संध्या बेहरे , मनिषा दुधे , ज्योती घोडमारे , सुनिमा काळबांधे , कल्याणी दहिकर,सुरेखा देविकार , सोनिया राऊत , मयूरी गुरनुले , प्रांजल राउत व इतर योगसाधक उपस्थित राहून सहकार्य केले .