चंद्रपूर : भद्रावती तालूक्यातील माजरी येथे जन्मदात्या बापानेच मुलीवर लैंगीक अत्याचार करून बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासला आहे. ही घटना गुरूवारी घडली आहे. याबाबत पोलिसांनी अत्याचारी बापाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका शाळकरी मुलीवर बापाने लैंगीक अत्याचार केला. याबाबत मुलीने माजरी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. या नराधम बापावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.