कारंजा : श्रीगणेश चतुर्थी दि.19 सप्टेंबर 2023 पासून,कारंजा शहरात श्रीगणेशोत्सवाचा आनंदोत्सव साजरा करण्यात येत असून,श्रीगणेशाला निरोप देण्याचा दिवस जवळ येत आहे. दि.28 सप्टेंबर 2023 रोजी अनंतचतुर्दशी असल्याने, सालाबादप्रमाणे यंदाही, सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळा कडून श्री गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या हर्षोल्सात पार पडण्याचे संकेत मिळत असून, मिरवणूकीत सहभागी होणाऱ्या आबाल वृद्धांची संख्या कारंजा शहरात मोठ्या प्रमाणात असते. शिवाय रस्त्याच्या दुतर्फा दर्शक महिला पुरुष मिरवणूकीच्या आजूबाजूने मिरवणूक पहाण्या करीता चालत असतात.त्या अनुषंगाने कारंजेकर गणेशोत्सव मंडळ आणि दर्शक नागरिकांना साप्ताहिक करंजमहात्म्य तसेच महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदे कडून सावध करण्यात येते की,सध्या कारंजा शहरातील, रामा सावजी चौक ते जयस्तंभ चौक पर्यंतच्या, प्रमुख विसर्जन मार्गावरील रस्त्याच्या कामाचे कॉक्रेटिकरण नुकतेच झाले असून,रामा सावजी चौक - भगवान महावीर चौक महात्मा फुले चौक बजरंग पेठ चौक ते जयस्तंभ चौकापर्यंतचा रस्ता काँक्रेंटिकरणामुळे उंच झालेला असून रस्त्याच्या दुतर्फा,सांडपाण्याच्या जुन्या नाल्या आहेत. (नाल्याचे नविन बांधकाम अद्याप बाकी आहे.) तसेच रस्त्याच्या दोन्ही कडेला भराव टाकलेला नसल्यामुळे रामा सावजी चौक ते बजरंग पेठेपर्यंतचा रस्ता अतिशय अरुंद झाला आहे.त्यामुळे रस्त्याच्या कडेने अपघात होऊन,माणसांचा आणि वाहनांचा अपघात होण्याची शक्यता जास्त आहे.
त्यामुळे मिरवणूकीचे दिवशी खबरदारी घेण्याकरीता व रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सावध करण्याकरीता गणेश मंडळांनी आपले स्वयंसेवक ठेवणे आवश्यक आहे.दर्शकांनी सुद्धा या रस्त्याने गर्दी करू नये.आणि बंदोबस्तावर असलेल्या पोलीस विभागाने सुद्धा नागरिकांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत करंजमहात्म्य परिवाराचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी व्यक्त केले आहे.