कारंजा (लाड) (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) -- एकीकडे नरेंद्र मोदी व अमित शहा देशात व्देषाचे राजकारण करत असताना दुसरीकडे काँग्रेस नेते राहुलजी गांधी मात्र, "एक व्देष मुक्त भारत घडविण्यासाठी, नफरत छोडो भारत जोडो" या अभियानाच्या माध्यमातून पदयात्रा काढून, सर्वसामान्य नागरिकात मिसळून,जनतेशी थेट संवाद साधत आहेत.मोदी-शहा ह्या जोडी ने देशात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. तर याउलट राहुल गांधी ह्यांना देशात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवावयाची असून,देशातील जनतेच्या मनात एकमेकांविषयी आपसात जी व्देषाची भावना आहे.ती नष्ट करायची आहे. आणि ह्यासाठीच राहुल गांधी यांनी स्वतःला देशासाठी अर्पण केले आहे.अश्या ह्या समस्त जनतेचे लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि लाडके काँग्रेस नेते माननिय राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त,स्थानिक कारंजा ग्रामीण रुग्णालयात शेकडो रुग्णांना फळ व बिस्किटांचे वाटप करण्यात आले
कारंजा लाड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ह्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भोजराज व वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी सहकार विभागाचे अध्यक्ष राजाभाऊ डोणगावकर उपस्थित होते.
ह्यावेळी वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जिल्हा समन्वयक अँड संदेश जैन जिंतुरकर,कार्यक्रमाचे आयोजक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमीर खान पठाण,भीमशक्ती संघटनेचे शहर अध्यक्ष प्रदिप राऊत,वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी पंचायत राज समितीचे अध्यक्ष अँड वैभव ढगे,जाकिर खांन,शहजाद खान,सुरेश भाऊ कांबळे,अझर खांन,विनय पांडे, विशाल बोदडे , मुज्जु खांन , अमीन खांन,निलेश मनवर,एन एस यु आय चे जिल्हाध्यक्ष अक्षय बनसोड,करण सोनोने,अभि देशमुख,जावेद खान,प्रफुल्ल गवई,रिजवान खांन,गौरव करडे, अजय बांडे,शुभम बागडे,अक्षय उके,देवराव जामनिक,निलेश कवळे रमेश रोकडे तसेच खेर्डा काळीचे माजी सरपंच प्रदिप वानखडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते असे वृत्त कॉंग्रेस सेवादलाचे जिल्हा समन्वयक अँड संदेश जिंतुरकर यांनी महाराष्ट्र साप्ताहिक पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....