ब्रम्हपुरी :-
तालुक्यातील चीचगाव येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदाची निवडनुक नुकतीच झाली असून अध्यक्ष पदावर पांडुरंग मोतीराम ठेंगरी यांची पुन्हा एकदा अविरोध निवड करण्यात आली.
गावातील तंटे गावातच मिटवून शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्थरावर महात्मा गांधी तंटामुक्त समितीची स्थापना करण्यात येते. त्यानुसार ग्रामपंचायत येथे २२ /८/२०२२ ला ग्रामसभेत सर्वानुमते पांडुरंग ठेंगरी यांची अध्यक्ष पदी अविरोध निवड करण्यात आली. तर समितिमध्ये सदस्य म्हणून सरपंच सौ. वनश्री शेंडे, उपसरपंच गिरिधर ठाकरे, हिरालाल खरकाटे, विलास राऊत, सुनिल अलोने, युवराज घोडेस्वार, पटवारी अलोने, मुखरू अलोने, देविदास लोनबले, जीवन महाडोरे, विभोर मेश्राम, नंदा अलोने, सुनिता शेंडे, संगीता अलोने यांची निवड करण्यात आली.
ग्रामस्थरावर असलेले तंटे गावातच मिटवून गावात शांतता व सुव्यवस्था यांचा सलोखा अबाधित राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी केला. समितीचा निवडी बद्धल आत्मारामजी महाडोरे, बाळकृष्ण उरकुडे, सोमेश्वर खरकाटे, माजी सरपंच बबन राऊत, नरेश निकोडे आसाराम ठेंगरी, ज्ञानेश्वर राऊत, बाळकृष्ण निकोडे, संजय उरकुडे, रसमान कोरडे, भाग्यवान अलोने, मोरेश्वर सावसागडे, शांताराम मेश्राम, खटूजी निकोडे, पुंडलिक अलोने, मारोती पारधी, दादाजी वसाके, नारायन मेश्राम, प्रफुल राऊत, देविदास राऊत, सुधीर प्रधान, रामदास वलके, हिरामण तलांडे, हिरामण कोरडे, सुरेश राऊत, धनराज बुल्ले यांनी पदाधिाऱ्यांचे निवडी बद्दल अभिनंदन केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....