कारंजा (लाड) : वैद्यकीय क्षेत्र म्हटले म्हणजे कारंजा येथील वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी व्यक्तिमत्वाचे जुने जाणते डॉक्टर मुजफ्फर खान यांचे नाव पुढे येते. कारंजा येथील महात्मा चौकामध्ये कल्पना फोटो स्टुडिओ समोर त्यांचे \"समर क्लिनिक\" आणि त्याला लागूनच त्यांच्या मुलाचे डॉ.आमिर खान यांचे \"समर हॉस्पिटल\" आहे. विशेष म्हणजे डॉ. मुजफ्फर खान हे रुग्न सेवेसाठी 24 तास उपलब्ध असतात. रुग्न तपासणी करतांना रुग्नांची परिस्थिती ओळखून ते सर्वप्रथम रुग्नाला धिर देवून रुग्नाचे मनोबल वाढवीतात. त्यांचेकडे गेल्यास जास्त तपासणी फी नाही.जास्त महागडी औषधे न देता आवश्यक तेवढीच औषधे देवून रुग्नाला आजारामधून 100% बरे करतात. शिवाय अंध, दिव्यांग व निराधार गोरगरीबांची मोफत तपासणी करून उपचार करतात.त्यामुळे त्यांचा नावलौकिक मोठा असून कारंजा शहरासह खेड्यापाड्यातील बहुतांश रुग्न त्यांनी गंभीर आजारामधून बरे केल्याचा इतिहास आहे.त्यामुळे त्यांचे नाव पंचक्रोशीत सुप्रसिद्ध आहे. सन 2019 मधील कोव्हिड 19 च्या कोरोना काळामध्ये आणि तत्पूर्वी काही वर्षापूर्वी आलेल्या चिकनगुनिया आजारामध्ये केवळ त्यांच्या अचूक मार्गदर्शनाने त्यांनी रुग्न बरे करून रात्रंदिवस रुग्नांची सेवा केली आहे. त्यामुळे त्यांच्या या सेवाव्रती कार्याची दखल घेऊन वैदर्भिय नाथ समाज संघटना कारंजा यांनी नुकतेच त्यांना त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दलचा आरोग्य विभागाचा सन 2025 चा \"महाराष्ट्र-भूषण\" पुरस्कार, कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या पहिल्या लोकप्रिय महीला आमदार तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती आ.सईताई डहाके, प्रमुख पाहुणे मुर्तिजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार हरिशजी पिंपळे, प्रमुख अतिथी विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजयजी कडोळे, स्वागताध्यक्ष गिरीधारीलालजी सारडा,सहस्वागताध्यक्ष निलेशजी सोमाणी, आयोजक वैदर्भिय नाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. पुनम पवार, संस्थापक सचिव एकनाथ पवार यांचे हस्ते देवून सन्मानित केले. त्याबद्दल कारंजा येथील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून डॉ. मुजफ्फर खान यांचे अभिनंदन होत आहे. सदहू पुरस्काराद्वारे वैदर्भिय चॅरिटेबल ट्रस्ट आणि ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल मी आनंदी असून, ह्या सन्मानाने माझे रुग्नसेवेचे बळ वाढले असल्याचा मनोदय व्यक्त करीत डॉ. मुजफ्फर खान यांनी आभार मानले आहे.