कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) - स्टेट बँक ऑफ इंडिया कारंजा शाखेने स्थापना दिना निमित्त नुकतेच डॉक्टर्स डे तथा नेत्रचिकित्सा शिबीराचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे मरणोत्तर नेत्रदानाकरीता नागरीकांनी पुढे यावे म्हणून यावेळी शहरातील नेत्रदात्याच्या परिवाराचा सत्कार करण्यात आला. याबाबत वृत्त असे की,वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जिल्हा समन्वयक व सर्वांच्या परिचयाचे अँड संदेश जिंतुरकर यांच्या सासुबाई स्व. सुषमा सुधीरकुमार मिश्रीकोटकर ह्यांचे दि. 2 मे रोजी काहीही ध्यानीमनी नसताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.अचानक आलेल्या या संकटामुळे त्यांची मुलगी सौ गुंजन जिंतुरकर व अँड संदेश जिंतुरकर तर पुरे हादरुन गेले होते. अश्यातच कारंज्यातील नेत्रदान व रक्तदान चळवळीचे प्रणेते शांत सुस्वभावी व्यक्तिमत्व असलेले धडाडी चे सामाजिक कार्यकर्ते संदेश चे मित्र प्रज्वल गुलालकरी यांनी संदेश जिंतुरकरशी संपर्क साधुन, सासुबाईचे नेत्रदान करावयाचे आहे काय ? म्हणून विचारणा केली असता अँड संदेश यांनी तात्काळ होकार दर्शविला.तसेच मुलगी सौ.गुंजनला ही विचारना केली असता त्यांनी सुद्धा क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला आणि नेत्रदानाची प्रक्रिया पार पडली .
या उपक्रमाच्या माध्यमातून इतरांना ही प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने समाज माध्यमावर बातम्या प्रसिद्ध झाल्या असता अँड संदेश जिंतुरकर यांचेकडे अनेकांनी संपर्क साधुन डोळे आम्हाला द्या .म्हणून विनंती केली तेंव्हाच आम्हाला जाणीव झाली की आपण दोन व्यक्तींना डोळे देऊन बाहेरील विविध जातीधर्माने व विविधतेने नटलेले सुंदर अस जग पाहण्याची संधी उपलब्ध करून देऊन महान असं पुण्याचं काम केले आहे. याशिवाय दुसरा आनंद जीवनात कोणताचं असु शकत नाही असे मत ह्यावेळी संदेश जिंतुरकर यांनी व्यक्त केले .
आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनात चांगल्या कामाची जाणीव ठेवणारे फार कमी लोक ह्या जगात असतात याची जाणीव ठेवून,स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्थापना दिवस व जागतिक डाॅक्टसॅ डे च्या निमित्ताने नेत्र तपासणी शिबिरात,अँड संदेश जिंतुरकर व गुंजन जिंतुरकर ह्या उभयतांचा सन्मान चिन्ह व एक छोटंसं रोपटं देऊन सत्कार करुन त्यांनी सामाजिक दायित्व पार पाडल्याची जाणीव प्रकर्षाने करुन दिली.यावेळी स्व. माणिकराव गहाणकरी गुरुजी या नेत्रदात्यांचे सुपूत्र धनंजय गहाणकरी यांचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला संजीवभाऊ रुईवाले यांच्या पुढाकाराने माणिकराव गहाणकरी गुरुजी ह्यांचे नेत्रदान पार पडले होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे , इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ शार्दूल डोणगावकर , डॉ. अजय कांत , निमा चे सचिव डाॅ. अमोल उगले , दिशा इंटरनॅशनल फाउंडेशन आय बॅंक चे हिमांशू बंड व ज्यांच्या कल्पकतेतुन ह्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते असे स्टेट बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक योगेश अवघडे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते , प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.