वाशिम : जिल्हा कारागृह वाशिम येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस. ठोंबरे,सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ.संजय देशपांडे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल कावरखे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.श्रीराम पाटील, वैद्यकिय अधिकारी डॉ.सतिश परभणकर,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.रामहरी बेले,कारागृह अधीक्षक अमृत आगाशे,तुरुंगअधिकारी दिलीपसिंग गिरासे,उमेश नाईक यांचे मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकिय अधिकारी डॉ.विजय गोटे यांचे सहकार्याने क्षयरोग कुष्ठरोग,किटकजन्य आजार, संसर्गजन्य आजार व एड्सबाबत बंदीस्तांची तपासणी करण्यात आली. वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी ५७ संशयित क्षय रुग्णांची एक्स रे काढण्याचे काम केले. समुपदेशक पंढरी देवढे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीमती आरु यांनी ५६ व्यक्तीची एच.आय. व्ही. तपासणी केली.तसेच पर्यवेक्षक महेंद्र खरतडे,अण्णासाहेब घुमरे , भारत ठाकरे यांनी ५७ कुष्ठरोगची तपासणी केली असता. त्यामध्ये १ कुष्ठरूग्ण आढळून आला. मलेरिया करीता ८ व्यक्तींचे रक्तनमुने घेण्यात आले व १० स्पुटम घेण्यात आले.सर्वांना क्षयरोग,कुष्ठरोग,एड्स, डेंग्यूबाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले.यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.