जाफराबाद:- जाफराबाद तालुक्यातील आंबेगाव येथील जिल्हा परिषद शाळेची शाळा व्यवस्थापन समिती शनिवारी गठित करण्यात आली. त्या समितीमध्ये अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर चीडे तसेच उपाध्यक्ष पदी प्रकाश धूपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दरम्यान समिती गठित करण्या साठी शाळेत पालक सभा आयोजित करण्यात आली त्या सभेमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात निवड करण्यात आली. त्या समितीमध्ये अन्य सदस्यामध्ये अलका विजय गोफणे, शोभा बालाजी चीडे, सरला ज्ञानेश्वर शिंदे, निर्मला ईश्वर कराळे , मुरलीधर म्हस्के, कविता संतोष शिंदे, उमेश शिंदे, ग्रा. प सदस्य किरण कराळे, केशव देठे शिक्षणप्रेमी सदस्य बळीराम शिंदे, शिक्षक प्रतिनिधी विष्णु बुधवंत तर सचिव पदी मुख्याध्यापक दामोधर डोईफोडे यांची निवड करण्यात आली.
यादरम्यान नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला यावेळी केशव देठे संतोष शिंदे प्रकाश धूपे, सर्जेराव शिंदे, दीपक धुपे, उमेश शिंदे, सतीश गालट, विजय गोफने, बाबासाहेब कराळे, ज्ञानेश्वर शिंदे ज्ञानेश्वर चिडे बालाजी चिडे, दत्ता कराळे, कृष्णा जराड दमोता देठे, बळीराम शिंदे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.