राज्याच्या आणि देश्याच्या राजकीय भुमिकेत निष्कलंक, निष्ठावान, प्रखर, प्रभावी व वंचित घटकातील जनतेला सत्तेचे दार उघडुन देणारे, आपणच आपले प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेचा वाटा आपल्या हातात घ्या असे ठणकावून सांगणारे , वंचित बहुजन हृदयसम्राट मा.श्रद्धेय ऍड बाळासाहेब आंबेडकर यांचा 68 वा वाढदिवस स्वाभिमान दिवस म्हणुन वंचित बहुजन आघाडी तालुका ब्रम्हपुरी च्या वतीने विविध माध्यमातुन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधुन सकाळी 9 वाजता ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथील रुग्णांना डॉक्टरांच्या उपस्थितीत फळवाटप करण्यात आले. यावेळी पक्ष्याचे तालुका पदाधिकारी जिल्हा सल्लागार डॉ प्रेमलाल मेश्राम, तालुका अध्यक्ष सुखदेव प्रधान, महासचिव लिलाधर वंजारी, उपाध्यक्ष अनिल कांबळे, जिल्हा महिला उपाध्यक्ष्या लीनाताई रामटेके, तालुका महिला अध्यक्षा पदमिनी धनविजय, अनंतकुमार मेश्राम आदि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर दुपारी 1 वाजता मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर मार्गदशनपर सभा संपन्न झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन मा ऍड दिलीपकुमार माटे, मा डॉ प्रा आर बी मेश्राम सर, डी एम रामटेके सर, डॉ प्रेमलाल मेश्राम, सुखदेव प्रधान सर, लीनाताई रामटेके, पदमिनी धनविजय प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले तर आभार लिलाधर वंजारी यांनी मानले. कार्यक्रमानंतर लगेच कार्यकर्त्यांना अल्पोपहार देण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी स्वाभिमान दिनाचे औचित्य साधुन जिल्हा सल्लागार डॉ प्रेमलाल मेश्राम व तालुका अध्यक्ष सुखदेव प्रधान यांनी प्रत्येकी दहा हजार रुपये भरून पक्ष्याचे आजीवन सभासदत्व स्वीकारलं. त्यांचे पक्ष्याच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला पक्ष्याचे तालुका पदाधिकारी, महिला , युवक असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.