वाशिम : शेतकऱ्यांच्या गळ्यातील मुकूटमणी ठरलेले वाशिम जिल्ह्याच्या ग्राम रुई गोस्ता येथील छत्रपती शिवाजी महाराज आदर्श समाजसेवक पुरस्कार विजेते ठरलेले सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी,महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांचेशी एका चर्चेदरम्यान "यंदाच्या मान्सूनचा पाऊस चांगला व मुबलक प्रमाणात होणार असून शेतकऱ्यांचे समधान करणारा ठरणार असल्याचे भाकित केले होते.या भाकिता सोबतच त्यांनी रोहिणीच्या जलधारा संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्र व महाराष्ट्रा शेजारील प्रदेशात बरसणार असल्याचे सांगितले होते." त्यांच्या ह्या अंदाजाचा प्रत्यय पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भासह आपल्या वाशिम जिल्ह्यातही दिसून आला आहे. "रोहिणीच्या धारांचा सर्वत्र सडा पडला तर मान्सूनचा पाऊस चांगला होतो." या वडिलधाऱ्यांच्या म्हणण्या प्रमाणे रोहिणीच्या धारा रिमझिम बरसल्याने ग्रामस्थ शेतकऱ्यामध्ये उत्साह संचारला असून त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सुर्याचा रोहिणी नक्षत्रात दि.24 मे 2024 रोजी प्रवेश झाल्यानंतर दि. 24 व दि.25 मे 2024 रोजी सर्वत्र आंशिक प्रमाणात रिमझिम पाऊस पडल्याचे वृत्त मिळाले आहे.त्यामुळे लवकरच बळीराजा बि बियाणे व खत खरेदीची कामे सुरू करणार असल्याचे संकेत मिळाल्याचे संजय कडोळे यांनी कळवीले आहे.