कारंजा : मागील शैक्षणिक सत्रात इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना अंतर्गत मिलेट चॉकलेटचे दिनांक 9 जून रोजी बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावार्डी येथील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये इयत्ता आठवीत असलेले व चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये इयत्ता नववी मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती योजने अंतर्गत मागील आठवड्यात मिलेट चॉकलेट प्राप्त झाले होते. त्या चॉकलेटचे वाटप यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय भड यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. त्यामध्ये ज्वारी, बाजरी व नाचणी यापासून तयार केलेल्या मिलेटच्या 25 चॉकलेटचा समावेश होता.
सदर मिलेट चॉकलेटचे वाटप करते वेळी शाळेचे मुख्याध्यापक विजय भड, शिक्षक गोपाल काकड, अनिल हजारे व शिक्षकेतर कर्मचारी राजू लबडे व वर्ग 9 विचे विद्यार्थी उपस्थित होते.