अवैध दारू सट्टा जुगार च्या बातम्या कितीही लावा ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन चे अधिकारी कर्माचरी आम्हाला काहीच करु शकत नाही. असे वक्तव्य अवैध धंदेवाले बोलतात.
चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी नुकतीच आठ-नऊ महिन्याअगोदर उठली. तर जिल्ह्यातील अवैध दारू विक्री संपली असे वाटत होते. परंतु उलट ग्रामीण भागातील बऱ्याच गावागावात रात्रीच्या सुमारास अवैध दारू पुरवली जाते. त्यामध्ये ब्रह्मपुरी-आरमोरी रोडवर असलेला चौगान -बेटाळा फाट्यावर व कीन्ही गावातील बस स्टॉप जवळ मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केली जाते.
चौगान-बेटाळा फाट्यावर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ,महाराष्ट्र ऑफ पॉलिटेक्निक बेटाळा कॉलेज बऱ्याच वर्षांपासून आहे. कृषक विद्यालय असून कॉलेज चौगान येथील शालेय विद्यार्थी रोज जाणे-येणे करीत आहेत. अवैध दारू विक्रीमुळे शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरातील किही,रणमोचन,बेटाळा,पारडंगांव,बोढेगांव येथील विद्यार्थी शिक्षणा साठी चौगानला येत असतात. महाराष्ट्र ऑफ पॉलिटेक्निक मध्ये तालुक्यातील व बाहेरील तालुक्यातील विद्यार्थी येत असतात. त्यांना मात्र सदर चौकातमोठ्या प्रमाणात अवैध दारू मिळत असल्यामुळे परिसरातील लोक दारू पिण्यासाठी जमा होत आहेत. त्याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष आहे. पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने होत आहे कि काय? तेथील मालक म्हणत आहे की तुम्हाला जेवढ्या बातम्या लावायच्या तेवढ्या लावा आम्हाला काही होणार नाही दारू मालक पोलिसांना खिशात घालून फिरवतो अश्या शब्दात तो पत्रकारांशी सुद्धा बोलतो तर बिटातील जमादार यांना दर महिन्याच्या हप्ता देत असल्यामुळे कारवाई करीत नाही. जनसामान्य नागरिकांमध्ये अशी चर्चा चौकात केली जात आहे. सदर चौकात अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण ?असा प्रश्न निर्माण झाला आहे.