वाशिम : गेल्या पाच वर्षाच्या विदर्भ लोककलावंत संघटनेच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर आणि दि. 24 जानेवारी 2024 च्या, निर्णायक ठरलेल्या क्रांतिकारी धरणे आंदोलनानंतर अखेर जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांनी एक जिल्हाधिकारी स्तरावरील व दुसरी मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावरील अधिकारी वर्गाचा समावेश असलेली समिती स्थापन करून या दोन समित्यांच्या अधिकारात, मागील पाच ते सात वर्षातील लोककलावंताच्या मानधनाकरीता प्राप्त झालेल्या व दिर्घकाळ प्रलंबीत असलेल्या सर्वच प्रस्तावाची छाननी करून, अर्जदार लोककलावंताच्या लोककलेचे दि. 04 मार्च 2024 ते दि 10 मार्च 2024 पर्यंत सादरीकरण व प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या.परंतु पुढे देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका जाहिर होऊन आचारसंहिता लागल्यामुळे, मानधन लाभार्थी म्हणून निवड झालेल्या लोककलावंताची निवड यादी जाहिर करण्यात आलेली नाही.मात्र आता लोकसभा निवडणूकीचा निकाल होऊन देशात नविन सरकार स्थापन झाले व त्यामुळे निवडणूक आचार संहिता सुद्धा संपुष्टात झालेली आहे.त्यामुळे आता जास्त वेळ न दवडता,लवकरात लवकर जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या निवड समितीने,मानधन लाभार्थी लोक कलावंताची निवड यादी जाहिर करून,त्यांना तातडीने सांस्कृतिक विभागाचे वृद्ध कलाकार मानधन अविलंब सुरु करण्याची मागणी विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेते दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी शासनाकडे केली असून लोककलावंताना योग्य तो न्याय देण्यास सांगितले आहे.