शहराच्या मध्यभागातून होणारी अवैध प्रवासी वाहतूक व वाहतूक कोंडी बाबत विविध वृत्तपत्रात प्रकाशित होतं असलेल्या बातम्या, तालुक्यातील स्थानिक नेत्यांनी केलेला विरोध, निवेदने,मागण्या इत्यादी प्रयत्नांनी सुद्धा संबंधित प्रशासनाला जाग आलेली नसून शहरात होतं असलेल्या "वाहतूक कोंडी" चा गंभीर विषय राज्य पातळीवर ही जाऊन थांबला असल्याने शहरात होतं असलेल्या वाहतूक कोंडी व अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी चौका चौकात व मोक्याच्या ठिकाणी CC TV कॉमरे लावले आहेत व ट्राफिक पोलीस ची सुद्धा नेमणूक करण्यात आली आहे तरी सुद्धा ब्रम्हपुरी शहरातील नागरी अवैध्य वाहतुकीमुळे त्रस्त झाले आहेत त्यामुळे या अवैध्य वाहतूकदारांना आशीर्वाद कुणाचा? या विवंचनेत नागरिक पडले आहेत
शहरातील आरमोरी चौक, ख्रिस्ताणंद हॉस्पिटल चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शाळा-कॉन्व्हेंट च्या मार्गांवर आणि इतर ही सर्वत्र अवैध प्रवासी वाहतुकीचा बोलबाला बिनधास्त सुरु असतांना, कुणी शासकीय माणूस दर आठ पंधरा दिवसात येतो एखाद्या अवैध वाहतूक करणाऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून बाजूला जातं "गुप्तचर्चा" करून निघून जातो असे नागरिकांकडून वारंवार प्रत्यक्ष पहिले जातं असल्याचे चर्चासत्र रंगत आहेत मात्र यामुळे होणारे अपघात व सामान्य नागरिकांना होणारा त्रास सर्वत्र जैसे थे दिसून येत असल्याने जनतेचे रक्षक झाले भक्षक असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
दिवसांगणिक शहरातील वाढती लोकसंख्या व व्यावसायिकांच्या अतिक्रमनाने होतं असलेले अरुंद रस्ते यामुळे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होतं चालला आहे मात्र संबंधित प्रशासनाचे त्यात मुख्य:त्वे अनेक कारणावरून दुचाकी धारकांना वेठीस ठरणाऱ्या पोलीस प्रशासनाचे होतं असलेले दुर्लक्ष बघता नागरिकात पोलीस प्रशासनाविषयी कमालीची नाराजगी दिसून येत आहेत