कारंजा : यंदा दि. 31 ऑगस्ट ते दि. 17 सप्टेबर 2024 पर्यंत दररोज काही ठिकाणी भाग बदलवीत श्री गणेशोत्सव, गौरीपूजन म्हणजे श्री महालक्ष्मी देवीचे दिवसात देखील पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ, मराठवाडा, खान्देश, मुंबईसह कोकण किनारपट्टी,पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र,मध्यप्रदेशात चांगलाच मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहणार असून, अनेक ठिकाणी नद्या, नाले, तलाव, धरणे तुडूंब भरणार असून धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याचा अंदाज जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज आदर्श समाजसेवक पुरस्कार प्राप्त, लोकप्रिय हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी भ्रमणध्वनीवरून महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीला आहे. त्यांच्या अंदाजाप्रमाणे आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कमीजास्त प्रमाणात सतत पाऊस सुरू असून आणखी गोकुळाष्टमी ते पोळा व त्यापुढे संपूर्ण श्री गणेशोत्सव काळात पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे यंदा श्रींचा श्री गणेशोत्सव साजरा करणाऱ्या बाल गणेश मंडळे व श्री गणेशोत्सव मंडळांनी सुरक्षीत मंडपात, ताडपत्री किंवा टिनपत्रे टाकून श्री गणेशोत्सवाची स्थापना करावी. तसेच अन्नदान करणाऱ्या सद्भक्त व श्री गणेशमंडळानी पावसाचा अंदाज घेऊन सांयकाळ पूर्वीच जेवणावळी वा महाप्रसाद कार्यक्रम ऊरकावेत असे त्यांनी सांगीतले आहे.तसेच रात्रीला होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रम,स्पर्धा,नाटक, एकांकिका शक्यतोवर खुल्या मैदानात न घेता सभागृहात घेण्याचे सुचविले आहे. तसेच वादळी पावसाच्या शक्यतेमुळे विद्युत पुरवठा खंडीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन श्री गणेशोत्सव मंडळांनी जनरेटरची व्यवस्था करावी असे देखील म्हटले आहे.सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने त्याचाच परिणाम होऊन पुढील काही दिवस,आजुबाजूचे जिल्हे,प्रांत इ ठिकाणी भाग बदलवीत हा पाऊस वादळी प्रकारात मुसळधार ते अतिमुसळधार प्रमाणात बरसणार असून,अनेक ठिकाणी विजा कोसळणार असल्याची संभावना असल्याने, शेतकरी,शेतमजूर,ग्रामस्थ, नागरीकांनी स्वतःच्या जीवित्वाची आणि आपल्या गुरावासरांची- शेळ्यामेंढ्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याविषयी साधारणत: एक महिन्या अगोदरच जिल्हयातील शेतकऱ्याचे लाडके हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी पूर्वानुमान दिलेले होते. यंदा पूरस्थिती निर्माण होऊन धरणे तुडूंब भरतील.नदी, नाले,तलावाची पूरस्थिती राहील. राज्याच्या काही भागात कमी जास्त परिस्थिती असली तरीही मात्र यंदा शेतकऱ्याकरीता मात्र त्यांनी आनंदाची वार्ता दिलेली होती.व त्यांच्या अचूक अंदाजाप्रमाणे यंदा "शेतकऱ्याच्या खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात चांगली पिके होऊन शेतकरी राजाच्या उत्पादनात आणि उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी समाधानी रहाणार असल्याचे" त्यांनी आपल्या प्रत्यक्ष मुलाखतीतून महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळविले होते. त्यांच्या अंदाजाप्रमाणे अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, गडचिरोली भागात पाऊस कमीजास्त प्रमाणात, विजेच्या प्रचंड कडकडाटासह ,भाग बदलवीत कोसळत असून, पुढे चार ते पाच दिवस काही भागात मुसळधार पाऊसाने पुरस्थिती निर्माण होणार आहे.तरी शेतकरी व विशेषत: ग्रामस्थ शेतमजूरांनी आकाशात पाऊसाचे ढग दाटून आल्याचे दिसताच आपल्या शेळ्यामेंढ्या,गुराढोरासह सर्व शेतमजूरांना घेऊन शेतातून गावाकडे परत यावे.हिरव्या झाडाखाली मुळीच आश्रय घेऊ नये. आपली गुरेढोरे, शेळ्यामेंढ्या, दुचाकी,फोर व्हिलर वाहने,बसगाड्या पाण्याच्या पुरामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नये.तसेच महत्वाचे म्हणजे विजाचा कडकडाट आणि ढगाचा गडगडाट सुरु असतांना विजेचे उपकरणे,दुरदर्शन,रेडीओ आणि मोबाईल (स्विच ऑफ) बंद करून ठेवावे.या संदर्भात सतर्कतेचा इशारा देतांना हवामान अभ्यासक गोपाल गावंडे आणि ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी, "शेवटी आपली सुरक्षा आपल्या हातात असल्याचे म्हटले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....