घुग्घुस (चंद्रपूर) : एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका आरोपीस घुग्घुस पोलिसांनी अटक केली. आरोपी अक्षय गरीबदास किन्नाके (23) रा. अमराई वार्ड, घुग्घुस यास दिनांक 10/05/2022 रोजी रात्री 10:20 वाजता घुग्घुस येथून अटक करण्यात आली आहे.
घुग्घुस येथे एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका महाविद्यालयात 12 व्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी आरोपी अक्षय गरीबदास किन्नाके (23) रा.अमराई वार्ड, घुग्घुस याने नोव्हेंबर 21 ते एप्रिल 22 दरम्यान वारंवार शारीरीक संबंध ठेवले त्यामुळे ती चार महिन्याची गरोदर झाली असून सध्या ति कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचार घेत आहे.
आरोपी अक्षय किन्नाके याची एका अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत नोव्हेंबर 21 मध्ये ओळख होऊन त्यांचे प्रेम संबंध जुळले आरोपीने आपल्या घरी शारीरीक सुखासाठी तीच्या सोबत शारीरीक संबंध ठेवले त्यामुळे ती चार महिण्याची गरोदर झाली. पो. स्टे. सेवाग्राम येथून शनिवार 7 मे रोजी कागदपत्र प्राप्त होताच घुग्घुस पोलीस स्टेशन येथे कलम 376 (2) (एन)(एच) सह कलम बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. घुग्घुस पोलिसांनी आरोपीस दिनांक 10 मे रोजी घुग्घुस येथून अटक केली. ठाणेदार बबन पुसाटे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास स. पो. नि. मेघा गोखरे करीत आहे.