कारंजा [ लाड ] : वाशीम जिल्ह्यातील जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ, विदर्भ लोककलावंत संघटना तथा संत नामदेव तुकाराम वारकरी पारिषद वाशिम जिल्ह्याच्या वतीने मागील पंधरवाड्यात, जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाचे हभप संजय म कडोळे यांनी, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, सांस्कृतिक मंत्री अमितजी देशमुख यांचेकडे, " आम्हा वारकऱ्यांचे मायबाप असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रखुमाई पदस्पर्शदर्शन सर्वांसाठी खुले करण्याची मागणी केली होती.". सदर मागणी बाबत शासनाने तात्काळ सकारात्मक भूमिका घेत येत्या चैत्र शु प्रतिपदा गुढीपाडवा दि .02/04/2022 पासून वारकऱ्यांचे माहेरघर असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रखुमाई पदस्पर्शदर्शन भाविकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतलेला आहे . त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये आनंदाचे वातावरण असून वारकऱ्यांतर्फे संजय कडोळे यांनी शासनाचे आभार मानलेले आहे .