सन २०२४-२५ आर्थिक वर्षातील वृद्ध साहित्यीक कलाकारांच्या प्रस्ताव मंजूरी करीता,विदर्भ लोककलावंत संघटनेची मागणी.
वाशिम : अद्यापपर्यंत,सन २०२४-२५ च्या आर्थिक वर्षातील,वृद्ध साहित्यीक कलाकारांच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्याची यादीच जाहीर न झाल्यामुळे वृद्ध साहित्यीक कलाकाराची उपासमार होत असल्यामुळे दि. ०७ जुलै २०२५ रोजी,विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हास्तरिय सभेमध्ये जावून मा. जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस.मॅडम यांची भेट घेऊन त्यांचेकडे तक्रार करीत, २०२४-२५ वर्षातील,वृद्ध कलाकारांच्या मानधना बाबत विस्तृत चर्चा केली.या चर्चेअंती मा.जिल्हाधिकारी यांनी वृद्ध कलाकारांचा विषय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचेकडे असल्याचे सांगून २०२४-२५ ची यादी जाहीर करण्याचे संबधितांना सांगीतले.या संदर्भात अधिक वृत्त असे की,विधानसभा निवडणूकांपूर्वी तत्कालिन पालकमंत्री ना.संजयजी राठोड यांच्याद्वारे गठीत करण्यात आलेल्या अध्यक्ष मा.पकंजपाल महाराज राठोड व सदस्यांच्या समितीने विधानसभा निवडणूकांपूर्वी,सहाय्यक उपायुक्त कार्यालय नालंदानगर येथील सभागृहात जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील सर्वच तालुक्यातील वृद्ध साहित्यीक व कलाकारांच्या कलेचे सादरीकरण घेऊन लाभार्थी निवड करून अति.मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांचेकडे मंजूरीकरीता पाठवली होती. परंतु नऊ ते दहा महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही सन २०२४-२५ ची लाभार्थी यादी मंजूर न झाल्याने, जिल्ह्यातील गरजू वयोवृद्ध,दुर्धर आजारग्रस्त, कलावंताची उपेक्षा आणि उपासमार होत आहे. त्यामुळे वारंवार कलावंत मानधन मंजूरीच्या अपेक्षेने संबंधित कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत.त्यामुळे अखेर विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी दि.७ जुलै २०२५ रोजी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस मॅडम आणि सहाय्यक उपायुक्त पियुष चव्हाण यांची समक्ष भेट घेऊन त्यांना २०२४-२५ ची लाभार्थी यादी जाहीर करण्याची विनम्र प्रार्थना केली असता याप्रकरणी लक्ष्य घालणार असल्याचे सहाय्यक उपायुक्त पियुष चव्हाण यांनी सांगितले.