नागभीड:-
आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी नागभीड तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालय, तळोधी (बा.) येथे सदिच्छा भेट दि. ९ ऑक्टोबर ला दिली.
यावेळी प्राचार्यांसमवेत विद्यालयाच्या परिसराची व मुख्यतः डिजिटल क्लासरूमची पाहणी केली आणि विद्यालयातील शैक्षणिक सोयी-सुविधांबाबत चर्चा करून आढावा घेतला.
तसेच, विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला. दरम्यान, आमदार बंटीभाऊंचे आगमनाप्रित्यर्थ विद्यालयाच्या वतीने प्राचार्यांनी शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत केले.
यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या मीना मॅडम व शिक्षकवृंद, भाजपा तालुकाध्यक्ष संतोषभाऊ रडके, नागभीड कृ.उ.बा. समिती सभापती अवेश पठाण, नागभीड कृ.उ.बा. समिती उपसभापती रमेश बोरकर, नागभीड कृ.उ.बा. समिती संचालक गणेश तर्वेकर, राजेश घिये, होमदेव मेश्राम, सोनू कटारे, अशोक ताटकर, सत्तार शेख, जिवेश सयाम, सोनू नंदनवार, सचिन मदनकर, सुभाष मस्के, नरेश खोब्रागडे, जावेद शेख, राहुल करीये, संतोष गोहणे, मारोती झोडे व अन्य मान्यवर आणि विद्यार्थीगण उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....