साने गुरुजींनी स्थापण केलेल्या आंतरभारती ट्रस्ट मुर्तिजापुर शाखेच्या वतीने महात्मा गांधीच्या स्मृति दिना निमित्त 30 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता International Convent School ,Tidke Nagar येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आंतरभारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब यांनी सांगीतले की म.गांधी यांची हत्या ही देशातील पहिली दहशतवादी घटना होती. अहिंसेचा पुजारी, वयोवृद्ध व निशस्त्र व्यक्तीच्या या क्रूर हत्येचा आम्ही निषेध करतो. बापुंच्या प्रेरणेतुन देशातील महिला मोठ्या संख्येने सार्वजनिक सत्याग्रहात बाहेर पडल्या होत्या. वर्तमान परिस्थितीत पुन्हा महिलांना पुढे येऊन देशाची विस्कटलेली घडी निट बसवावी लागेल. म्हणून या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
2023 ला हैद्राबाद येथे महिलांची रॅली काढून सुरुवात करण्यात आली.
यावर्षी संभाजीनगर, हैद्राबाद, आंबेजोगाई, अहमदनगर, पुणे, लातुर व मुर्तिजापुर आदी ठिकाणी 30 जानेवारी रोजी महिलां मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. अकोला वनराईचे संयोजक तथा गांधी विचाराचे अभ्यासक मा. बबनराव कानकिरड मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.
या महिला मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन आंतरभारती शाखा मुर्तिजापुर व मराठा महिला मंडळ मुर्तिजापुर कडुन करण्यात येत आहे.