अकोला:- वारकऱ्यांचा सन्मान ज्येष्ठ नागरिक तसेच मातृ शक्तीचा सन्मान विविध समाजासाठी महामंडळे स्थापना करून शेतकऱ्यांसाठी सन्मान व अकोला पूर्वचा सर्व स्पर्शी विकास करण्यामध्ये आमदार रणधीर सावरकर यशस्वी ठरले असे प्रतिपादक हरिभक्त पारायण वासुदेवराव महल्ले यांनी केले. खडकी भागात संवाद बैठकीत ते बोलत होते यावेळी खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर जयंत मसने डॉक्टर किशोर मालोकार देवाशिष काकड गणेश अंधारे विनोद मापारी विजय इंगळे गणेश सारसे कुठे महाराज गजानन राऊत गोरले काका राजूभाऊ घोगरे गोपाल मुळे एडवोकेट नितीन गवळी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी खासदार अनुप धोत्रे यांनी अकोला पूर्व चा विकास सोबत महाराष्ट्राचा विकास करण्यामध्ये महायुती सरकार यशस्वी ठरले असून सन्मान सोबत मानवता सदैव उपलब्ध मतदारांसाठी सेवेसाठी हजर ही आमदार रणधीर सावरकर यांची ओळख व सत्य व सामाजिक दायित्व शेतकऱ्यांच्या विषयी तळमळ नागरी समस्यांची जाण ही गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांनी विधिमंडळ आणि विधिमंडळाच्या बाहेर यशस्वीपणे सिद्ध केले असेही सांगितले यावेळी कुंटे महाराजांनी यांनी महायुतीने वारकऱ्यांसाठी महामंडळ तसेच मार्ग वारकऱ्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल व संत महात्म्यांचे स्मारक उभारण्याचे काम करून वारकऱ्यांचा सन्मान केला आहे यावेळी आमदार सावरकर मी मतदाराविषयी बांधिलकी असून कर्तव्य आणि त्यांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे कर्तव्य आहे आणि यासाठी आपण महायुती सरकारचे विशेषता देवेंद्र फडणवीस यांचे आभार त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचा संचालन गणेश अंधारे तर विनोद मापारी यांनी प्रास्ताविक तर आभार प्रदर्शन गणेश सारसे यांनी केले