कारंजा : कारंजा तालुक्यात शुक्रवारी दुपारी १२ :०० वाजता अकस्मात अस्मानी संकट आल्याने,वादळी वारा,गारपिटीसह अवकाळी पाऊसाने हजेरी लावल्यामुळे बाजारपेठेत धावपळ आणि व्यापार्याची तारांबळ उडाल्याचे चित्र होते तर रहदारीतील लोकाची कुचंबना झाली.एकीकडे शेतकरी बांधवाच्या शेतमालाचे बाजारपेठेत प्रचंड नुकसान झाले तर दुसरीकडे शेतातील भाजीपाला पिकाचे व फळ बागाचे नुकसान झाले. या अवकाळी पाऊसाची विशेषत : म्हणजे पावसाळ्याप्रमाणेच संपूर्ण आकाश ढगांनी तुडूंब भरलेले दिसत असून,अगदी पावसाळ्यातील झडी सदृश्य पाऊस संपूर्ण दिवसभर कोसळल्याने भर उन्हाळ्यात शेतामधून पाण्याचे पाट वहात होते. श्री हनुमान जयंतीत्सवानिमित्त ठिकठिकाणी सुरु असलेल्या यात्रा महोत्सव व महाप्रसाद कार्यक्रमात अस्मानी विघ्न आल्याने भाविकांची सुद्धा तारांबळ उडाली असल्याचे वृत्त आमचे प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले असून आणखी दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात येते.