वाशिम : राष्ट्रीय एकात्मता, शांती, सलोखा, सौहार्द, सद्भावना टिकविण्यासाठी, ऐन कडाक्याच्या थंडीमध्ये, थंडी-ऊन-पाऊस-वारा याची तमा न बाळगता निघालेल्या खा. राहुलजी गांधी पदयात्रेमध्ये सर्वत्र आनंद, उत्साह व जल्लोषाचे वातावरण असून, दि. १५ नोहेंबर रोजी प्रातःकाळी सरर्हु भारत जोडो यात्रा विदर्भाच्या प्रवेशद्वारावर पोहोचताच कन्हेरगाव नाक्याजवळच्या रांजगावस्थित पैनगंगा नदी जवळच्या विदर्भ मराठवाड्याच्या सिमारेषे जवळ खा. राहुल गांधी यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी माजी कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकुर, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,यवतमाळचे माजी मंत्री प्रा वसंत पुरके, माजी गृहमंत्री माणिकराव ठाकरे, चंद्रपूरचे विजय वड्डेट्टीवार, उपस्थित होते. वाशिम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमदार अमित झनक, शिक्षक आमदार किरणराव सरनाईक , जिल्हा परिषदेचे सभापती चक्रधर गोटे, डॉ. श्याम गाभणे जिल्हा सेवादल अध्यक्ष डॉ विशाल सोमटकर, वैभव सरनाईक,ज्येष्ठ काँग्रेस नेते अरविंद लाठीया, प्रदिप वानखडे, पत्रकार संजय कडोळे, सेवादल काँग्रेसचे जिल्हा समन्वयक अॅड संदेश जिंतुरकर, राजिक शेख, काँग्रेस कमेटी प्रदेश महासचिव दिलीप भोजराज, उंबर्डा बाजार सरपंच राज चौधरी, रामबकस डेंडूळे, निळूभाऊ गजभिये, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ज्योतिताई गणेशपुरे, लियाकत मुन्निवाले , आमिर पठान, कादरखान, राजाभाऊ डोणगावकर ,कनिराम जाधव, गजानन अमदाबादकर, परशराम जाधव, अरबिंद इंगोले, उमेश शितोळे इत्यादीची यावेळी उपस्थिती होती. यशोमती ठाकुर, गुरुदेव सेवाश्रम कार्यकर्ते यांनी राष्ट्रसंता सोबतच्या भेटीचे पंडीत नेहरू इंदिराजी सोबतचे क्षणचित्र राहुलजी यांना भेट दिले तर अनिसचे पूर्णाजी खंदारे, विदर्भ लोककलावंत संघटनेचे संजय कडोळे, प्रदिप वानखडे यांनी सुद्धा ग्रामगीता , भगवी टोपी देऊन राहुलजी यांचे स्वागत केले. याप्रसंगी वाशिम जिल्ह्यातील आदिवासी कलाकार, गोंधळी, नाथ, बहुरुपी, डोंबारी इ.संपूर्ण विदर्भातील लोककलांवतांनी आपल्या सांस्कृतिक कलेचे प्रदर्शन घडवीले. व भारत जोडो पदयात्रेत सहभागी झाले .

प्रवेशद्वारावर लाल किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आलेली होती. पुढे ही यात्रा वाशिम जिल्हयात दाखल झाल्यानंतर, तोंडगाव, बोराळा फाटा इ ठिकाणी राहुलजी यांनी क्रांतिविर बिरसा मुंडा जयंती निमित्त अभिवादन केले . वाशिम शहरात डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौकात राहुलजी यांची कॉर्नरसभा पार पडली. यावेळी वाशिमकरांचा उत्साह बघून बोलतांना राहुलजी म्हणाले, "सर्वधर्मियांना, तळागाळातील लोकांना एकत्र जोडण्यासाठी आणि देशाची एकात्मता राखण्यासाठी माझी ही भारत जोडो यात्रा आहे ."संपूर्ण विदर्भातून वाशिम येथे जमलेल्या शेतकरी, उद्योजक, लोककलावंत, पदाधिकारी कार्यकर्त आणि नागरिक यांचे कडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघून खा राहुलजी अक्षरशः आनंदाने भारावून गेलेले होते. यावेळी कारंजा शहरातून वृत्तसंकलनाकरीता ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे, विनोद गणविर, सौ मोनाली गणविर व महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेची टिम संपूर्ण दिवसभर वृत्तसंकलन व छायाचित्रण करीत असल्याचे दिसून येत होते. खा. राहुलजी गांधी यांच्या वाशिम जिल्हा भेटीमुळे, वाशिम जिल्ह्यासह, संपूर्ण विदर्भातील राष्ट्रीय काँग्रेसला नवसंजिवनी मिळणार असून, काँग्रेस मधील सर्व गट तट एकत्र आल्याचे चित्र दिसून आले असून, लाखो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला,याचा थेट परिणाम लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांमधून बघायला मिळणार असल्याची दाट शक्यता नागरिकांमधून व्यक्त होत होती .
आपल्या प्रतिक्रिया द्या....