कारंजा नगरीमध्ये दिनांक १८ ऑगस्ट २०४ रोजी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धकांनी भाग घेतला होता.त्यामुळे या मॅरेथॉन स्पर्धेची कारंजा शहरांमध्ये ऐतिहासिक स्पर्धा म्हणून नोंद झाली आहे. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. अजय कांत व त्यांच्या संपूर्ण टीमचे मोठे योगदान आहे.
वाशिम जिल्हा ॲथलेटिक संघटना व लोकमान्य व्यायाम शाळा,कारंजाच्या संयुक्त विद्यमाने कारंजा शहराच्या इतिहासात पहिल्यांदा १८ ऑगस्ट रोजी सकाळी ६:०० वाजता स्व.प्रकाशदादा राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा झाली आहे.या स्पर्धेत सर्व वयोगटातील तब्बल १,८०० स्पर्धकांनी भाग घेतला विद्याभारती महाविद्यालयाच्या मैदानातून या स्पर्धेला सुरुवात होणार झाली.३,५ व १० अशा तीन गटात ही स्पर्धा विभागण्यात आली,नाशिक,या संभाजीनगर,बुलडाणा, नागपूर,अकोला,यवतमाळ, अमरावती या मोठ्या शहरातून सुमारे १,८०० स्पर्धकांनी आपल्या नावांची नोंदणी करून स्पर्धेतील सहभाग निश्चित केला आहे. शहरातील जे.सी हायस्कूल,जेडी हायस्कूल, ब्ल्यू चिप कॉन्व्हेंट हायस्कूल, शोभनाताई हायस्कूल, विद्यांभर हायस्कूल, विद्याभारती कॉलेज,के.एन. कॉलेज,तसेच शहरातील वकील मंडळी,पत्रकार मंडळी,राजकीय मंडळी समाजसेवक मंडळी,डॉक्टर मंडळी,व्यावसायिक मंडळी विशेष म्हणजे महिलांनी या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने भाग घेतला.जिल्ह्यात प्रथमच राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली असून, प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या स्पर्धकावर रोख बक्षिसांचा वर्षाव केला जाणार आहे.तीन,पाच व दहा अशा तीनही गटातील महिला व पुरुष विजयी स्पर्धकांना ही बक्षीसे विभागून दिली जाणार आहे.तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकाला एक टी-शर्ट व मेडल भेट म्हणून देण्यात आले आहे.