न्यू तापडीया नगरमध्ये डाक कार्यालय व निंबा येथे आधार कॅम्प घेण्याविषयी चर्चा.
राष्ट्रीय डाक सप्ताहात डाक कर्मचाऱ्यांचा गौरव समारंभ
अकोला:--- "अहर्निश सेवामहे" हे ब्रिदवाक्याचे तंतोतंत पालन करीत देशातल्या शहरी भागात आणि गावागावात वर्षानुवर्षांपासून आपल्या सुलभ सेवा देणारा डाक विभाग स्वतःच्या क्षमता सिध्द करणारे सर्वात प्रामाणिक सरकारी खाते आहे.परंतू वाढलेला सोशल मिडीया आणि कंपन्यांना मोडकळीस आणणाऱ्या चुकीच्या बेजबाबदार सरकारी धोरणामुळे डाक विभागाला आज प्रचंड संघर्ष करावा लागत आहे.असे वास्ववतावादी मतप्रदर्शन दै.देशोन्नतीचे मुख्य संपादक,जेष्ठ पत्रकार श्री.प्रकाशभाऊ पोहरे यांनी केले.

राष्ट्रीय डाक सप्ताहात डाक विभागाचा आर्थिक आलेख उंचावण्यात उल्लेखनिय सेवाकार्य करणाऱ्या तथा आवर्ती आणि बचत खाते व ईतर स्त्रोत वृध्दीचे व्यापक कर्तव्य सिध्द करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.त्यासाठी खास आयोजित केलेल्या कर्मचारी गौरव समारंभात इंडीयन लॅंग्वेज न्यूजपेपर असोसिएशन ( ईलना) या देशातील सर्वभाषिक वृत्तपत्र संपादक प्रकाशकांच्या राष्ट्रीय संघटनेचे उपाध्यक्ष व श्री. प्रकाशभाऊ पोहरे, व त्याच संघटनेचे राष्ट्रीय पदाधिकारी तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक -राष्ट्रीय अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार संजय एम.देशमुख या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या मनोगतातून श्री संजय देशमुख यांनी टपाल सेवांमध्ये कुरिअरपेक्षाही गतीशील झालेल्या सेवांमुळे जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणाऱ्या डाक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.त्याचप्रमाणे टपाल विभागात कार्यक्रमात दिसणाऱ्या जास्तीत जास्त प्रमाणातील कर्मचारी युवाशक्ती बद्दल आनंद व्यक्त करून वृत्तपत्रांच्या वितरणामध्ये आढळणारी दिरंगाई दुर करून पत्रकारांना सुलभ सहकार्य देण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली. वाढत्या लोकवस्तीच्या विचार करता न्यू तापडीया नगर येथे डाक कार्यालय व निंबा येथे आधार कॅम्प घेण्याविषयी यावेळी प्रवर अधिक्षकांशी चर्चा करण्यात आली.

डाकविभागाच्या योजना आणि बचत योजनांचे महत्व अधोरेखित करणाऱ्या टेलिफिल्मचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.ती निर्माण करणारे विनोद पाटील,उमेश देशमुख,सागर कानपूर व त्यामध्ये भूमिका साकारणारे प्रमोद बिहाडे,निलीमा बिहाडे,खूशी बिहाडे या कर्मचाऱ्यांचाही ईतर कर्मचाऱ्यांसोबतच या समारंभात गौरव करण्यात आला.
अकोला -वाशिम डाक विभागाचे प्रवर अधिक्षक श्री संजय आखाडे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.त्यांनी मुख्य डाक घराच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पोस्ट विभागाच्या बचत,विमा,पोस्टल आणि बॅंकींग आणि आधारकार्ड,पासपोर्टसह विविध योजना आणि सेवांची माहिती पूर्ण केलेल्या उद्दिष्टांच्या आकडेवारीसह यावेळी विषद केली. या कार्यक्रमाला सर्वश्री बावस्कर , हिवराळे, नानीर , कुलट,,शेख जुनेद,मार्केटींग अधिकारी शाकीर अहमद, श्री हागे, व ईतर अधिकारी आणि बहूसंख्य कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन व आभारप्रदर्शन दिपक पाथ्रीकर यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....