दि. १५ ऑगस्ट 2023 ला भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्य ब्रम्हपुरी तालुका बुद्धिबळ संघटना ब्रम्हपुरी च्या वतीने "स्व. अभिजित जगनाडे स्मृती स्वातंत्र्य दिन बुद्धिबळ स्पर्धा -2023"चे भव्य आयोजन स्वागत मंगल कार्यालय ब्रम्हपुरी "येथे करण्यात आले. स्पर्धेत एकूण १८४ खेळाडूंनी भाग घेतला. स्पर्धेचे प्रयोजक "स्व.अभिजित जगनाडे स्मृती प्रतिष्ठान ब्रम्हपुरी तर्फे एकूण 12000/- रुपयाचे रोख बक्षीस वा प्रोत्साहन पुरस्कार होते. स्पर्धेचे उदघाटन 10.30 वाजता BTCA चे संस्थापक सचिव तथा मार्गदर्शक श्री हरिश्चंद्रजी चोले व पदाधिकारी यांचे हस्ते करण्यात आले. ओपन व विद्यार्थी गटातील सात फेऱ्या पूर्ण करून 5.00 वाजता स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. ओपन गटात -साहील घोरगाटे प्रथम, कुमार कंकम द्वितीय व अजयकुमार सिंग तृतीय ,मुकूल सयाम चतुर्थ , दिपक सहारे पाचवा ,तसेच विद्यार्थी गटात -सार्थक वासेकर प्रथम, अर्णव पेड्डीवार द्वितीय व साहित्य तायवाडे तृतीय, ओम मरस्कोल्हे चतुर्थ व सोहम आखाडे पाचवा अश्याप्रकारे विजयाचे मानकरी ठरले.
दोन्हीही गटात 10-10 रोख पुरस्कार व 5-5 प्रोत्साहन पुरस्कार देऊन खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. बक्षिस समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.देविदासजी जगनाडे ब्रम्हपुरी, बक्षीस वितरक व प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ.एन.एस.कोकोडे ब्रम्हपुरी, तसेच प्रमूख अतिथी श्री. सुखदेवजी प्रधान ब्रम्हपुरी , श्री दिलीपराव जगनाडे,प्रा.सतिश शिनखेडे सर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून बक्षीस वितरण केलेत. मुख्य ऑरबिटर श्री. रितेश उरकुडे,श्री. निलेश बांडे, व श्री.प्रकाश वैद्य,श्री.रोशन सहारे तसेच आदित्य दुपारचे व मुकुल सयाम यांनी योग्य नियोजन करून स्पर्धा यशस्वी केली.प्रास्ताविक श्री तुळशीरामजी सपाटे सचिव BTCA यांनी केले तर श्री संजयराव देव सर यांनी संचालन व श्री मुनिराज कुथे सर यांनी आभार प्रदर्शन केले. श्री हरिश्चंद्रजी चोले संस्थापक सचिव, श्री दशरथ बांडे अध्यक्ष BTCA, श्री सचिन राऊत,श्री महादेवजी दर्वे, श्री गोकुलदासजी खोब्रागडे उपाध्यक्ष ,श्री शंकररावजी नाकतोडे , श्री झुबेर राय्यानी, वेदांत बांडे,श्री दामोधर बावनकुळे व BTCA चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे उपस्थितीत स्पर्धेची सांगता करण्यात आली.