ब्रम्हपूरी तालुक्यातील पिंपळगाव भो. येथील कु. युक्ती प्रमोद मिसार (वय 2 वर्ष) ही चिमुकली स्वयंपाक घरात गेली. तिथे वरण शिजवून गंजात ठेवले होते. त्या गरम वरणाच्या गंजात ती चिमुकली अनावधानाने पडल्याने तीचे शरीर भाजले. तिच्यावर खाजगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
पिंपळगाव भो. येथील सुषमा हेमराज लूलेकार (वय 35 वर्ष) ही महीला शेतात काम करीत असतांना तिला सर्पदंश झाला. तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ह्या दोन्ही रुग्णांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करतांना कुटुंबियांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सदरची बाब पिंपळगाव भो. येथील ग्राम काॅंग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे विरोधीपक्षनेता, आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना कळवताच त्यांनी आपल्या कडून सदर कुटुंबियांना आर्थिक मदत पाठवली.
सदरची आर्थिक मदत देतांना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश वारजूरकर, काॅंग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश संघटक धनराज मुंगले, पं.स. माजी सभापती नेताजी मेश्राम, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्मिताताई पारधी, बाजार समितीचे माजी संचालक वामन मिसार, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले, सरपंच सुरेश दुनेदार, ग्राम काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रशांत बगमारे, जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार, प्रा.डि.के. मेश्राम, तोरगाव सरपंच संजय राऊत, कालेता सरपंच राकेश पिलारे, ग्रा.पं.सदस्य सुनीता विधाते, ग्रा.पं.सदस्य मंगेश भुते, तंमुस अध्यक्ष अक्षय लोंढे, शा.व्य.समिती अध्यक्ष गणेश कामडी, दिलीप सेलोकर, रामभाऊ माकडे, गिरीधर भाजीपाले, विनोद टिकले, माजी तंमुस अध्यक्ष अनिल शेबे, ईश्वर कुथे, देविदास ठाकरे, भिमराव वंजारी, सोमेश्वर उपासे यांसह अन्य गावकरी यावेळी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....