वाशिम :वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात स्थानिक पी.एम.श्री.जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे जागतिक वाघ दिन साजरा करीत वाघ वाचवण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.मानवी साखळीतून save tiger सेव्ह टायगर तयार करून वाघ वाचवण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.दगडावर चित्रकारी करून विद्यार्थ्यांनी वाघाची आकर्षक चित्रे दगडावर काढलीत. मुख्याध्यापक प्रा. सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात प्रकल्प प्रमुख गोपाल खाडे,कलाशिक्षक कैलास वानखडे व गजानन देशमुख,दिपाली खोडके, चंद्रशेखर पिसे,सतीश चव्हाण, शितल देशमुख,नीता तोडकर, भूमिका भाकरे, पुष्पा व्यवहारे, प्रमोद सांगळे,धनु गारवे,अंकिता किर्दक सर्व शिक्षक वृंद यांनी हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मदतीने राबविला.जगातील वाघांची कमी होणारी संख्या हे संकटाचे द्योतक आहे.जनसामान्यात जनजागृती व्हावी विद्यार्थ्यांना वाघाचे निसर्गातील महत्त्व कळावे, वाघांच्या अधिवासाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वर्ग ५ वी ते ८ वीतील विद्यार्थ्यांना वाघ वाचवण्याची शपथ नीता तोडकर यांनी दिली.त्यांनी निसर्ग वाघ जैवविविधता वाचवण्याचे आवाहनही याद्वारे केले.आयशा मेमन,दिव्या परते,वैदही माटे,पूर्वी ठाकरे,गायत्री गव्हाणे, सोहम राठोड,आरती मिसाळ, अल्तमशोद्दीन काजी,तेजस्विनी धामोरे,मोनाली देशमुख मयुरी भेंडे,अपूर्वा वर्धे, खुशी भजभुजे आराध्या गायधने,आराध्या कोल्हे,आरुषी विद्वांस,मानवी भजभुजे वेदांशी हिंगे,मानवी लाडवीकर या विद्यार्थ्यांनी वाघांची सुंदर चित्रे काढली."वाघ दिवस साजरा करायचा म्हणजे केवळ भाषणं देणं नव्हे, तर कृती करण्याची प्रेरणा घेणं.वाघ आज संकटात आहे, कारण आपण त्याच्या जंगलावर अतिक्रमण केलंय, शिकार वाढवलीय.म्हणून आता वेळ आहे.आपण झाडं लावूया, जंगलं वाचवूया, आणि वाघाला त्याचं घर परत देऊया.वाघ वाचवणं म्हणजे आपल्याला स्वतःला वाचवणं!" असे मत राधा निंघोटने व्यक्त केले.पायल माहूरकर हिने "वाघ हा केवळ एक प्राणी नाही, तो आपल्या निसर्गाचा राखणदार आहे. वाघ जर टिकला, तर जंगल टिकेल… आणि जंगल टिकलं, तर आपलं जीवनसुद्धा टिकेल.आज वाघ संकटात आहे.त्याच्या घरावर म्हणजे जंगलावर अतिक्रमण वाढतंय, शिकार थांबत नाहीये.आपण तरुण पिढी म्हणून निसर्गाशी नातं जपणं हे आपलं कर्तव्य आहे.वाघ वाचवण्यासाठी झाडे लावूया, जंगल वाचवूया, आणि लोकांमध्ये जागरूकता वाढवूया.कारण वाघ वाचला, तर आपली संस्कृती, आपलं पर्यावरण आणि आपल्या भावी पिढ्यांचं भविष्य सुरक्षित राहील असे मत व्यक्त केले.कार्य क्रमाच्या यशस्वी शेती करता शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आता परिश्रम घेतले असे वृत्त संजय कडोळे यांनी कळविले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....