वाशिम : "शिक्षक आमदार ॲड. किरणराव सरनाईक हे एवढ्या मोठ्या अमरावती विधान परिषद मतदार संघाची धुरा सांभाळत असतांनाही रात्रंदिवस शिक्षक-कर्मचारी आणि सर्वसामान्य जनते मध्ये सहजपणे मिसळून त्यांची गाऱ्हाणी व तक्रारी ऐकून घेऊन त्यांच्या समस्यांना वाचा फोडून त्यांच्या न्याय मागण्या पूर्ण करून घेण्याकरीता सातत्याने विधान परिषद सभागृहात प्रश्न मांडून त्यावर चर्चा घडवून आणून प्रत्यक्ष मागण्या पूर्ण करून घेत असतात. स्वतः आमदार असूनही ते सहजपणे सर्वांना भेटत असतात.त्यांच्या भेटीकरीता कोणत्याही व्यक्तीला पूर्वसूचना देवून त्यांचा वेळ (अपॉयमेंट) घ्यावी लागत नाही. प्रत्येकाचा फोन ते स्वतः घेऊन त्यांचे समाधान करतात.एखादेवेळी बिझी असल्यास लगेच फोन घेतला नाही तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते सर्व मिस कॉल बघून त्यांना आवर्जून फोन करतात.त्यामुळे संपूर्ण अमरावती विधान परिषद मतदार संघातील शिक्षक कर्मचाऱ्याचे आवडते आमदार म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांची व आमची मैत्री इ. सन 1985 पासून अविरत टिकून आहे. आमची मैत्री कृष्ण सुदाम्या प्रमाणे असून ज्या ज्या वेळी प्रदिप वानखडे व मी संजय कडोळे त्यांना भेटायला जातो. त्या त्या वेळी ते कितीही महत्वाच्या कार्यक्रमात व्यस्त असले तरीही माझे मित्र आले त्यांना लगेच बोलवा.असे म्हणून आनंदाने आमचे स्वागत करतात. हा माझा अनुभव आहे. त्यामुळे अशा समाजाला प्रिय मानणाऱ्या मनमिळाऊ आणि अद्भूत व्यक्तीमत्वाचा आ.ॲड. किरणराव सरनाईक यांचा वाढदिवस साजरा होतो आहे. त्या निमित्ताने त्यांना कोटी कोटी शुभेच्छा !" अशा शब्दात विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी आपले विचार मांडले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिक्षक आमदार ॲड.किरणराव सरनाईक यांच्या परिवारावर काही महिन्यापूर्वी दुःखद घटना घडल्यामुळे त्यांनी आपल्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द केलेले होते.मात्र तरीही त्यांच्या जवळचे मित्र असलेल्या कारंजा येथील प्रदिप वानखडे,संजय कडोळे,गणेशराव काळे यांनी त्यांना व सरनाईक कुटुंबाला धिर देत आपल्यावर समाजाची सेवा करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे दुःखातून आपण बाहेर पडलेच पाहिजे.अशी विनंती केली.तसेच वाढदिवस हा शुभेच्छा पुरता मर्यादीत नसून त्यानिमित्त समाजातील लोकांच्या भेटीगाठी होऊन आपआपसातील प्रेम वृद्धिंगत करण्याचा योग असतो.अशा शब्दात त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे,उपाध्यक्ष प्रदिप वानखडे,गणेशराव काळे, उमेश अनासाने,लक्ष्मणराव इंगळे, कैलाश हांडे,गोलू पाटील लाहे इत्यादी मंडळीनी शाल व पुष्पगुच्छ देवून आ.ॲड. किरणराव सरनाईक यांचा सत्कार केला.उपस्थितांनी अँड. सरनाईक यांच्या विधायक कार्यावर प्रकाश टाकला. हा छोटेखानी कार्यालय श्री शिवाजी महाविद्यालय सभागृह वाशिम येथे पार पडला .